Join us

संजय खानने भर पार्टीत झीनत अमानला बेदम मारलं अन् तिचं करिअल संपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 1:33 PM

1 / 7
झीनत अमान ही ७० आणि ८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने तेव्हाच्या सगळ्या मोठ्या स्टारसोबत काम केलं. तिच्या कामाचं आणि सौंदर्याचं कौतुकही झालं. पण तिची पर्सनल लाइफ नेहमीच वादात होती. झीनत आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जात होती. पण तिचा हा बोल्डनेस तिच्या पथ्यावर पडला. एक दिवस तिच्या आयुष्यात अशी घटना घडली की, ती हळूहळू ग्लॅमर विश्वापासून दूर गेली.
2 / 7
राजकपूर यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' मध्ये झीनतने एक अशी भूमिका साकारली होती जिचा चेहरा बालपणापासून जळालेला आहे. यशाच्या शिखरावर असताना अशी भूमिका करत झीनतने मोठी हिंमत दाखवली होती. या सिनेमामुळे ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री झाली. पण तिला काय माहिती मेकअपच्या माध्यमातून चेहरा खराब करणारा तिचा अभिनय एक दिवस तिच्या जीवनातील सर्वात वेदनादायी सत्य ठरेल.
3 / 7
संजय खानसोबत लग्न केल्यावर झीनत अमानच्या आयुष्यात ती काळरात्रही आली, जेव्हा तिच्या चंद्रासारख्या सुंदर चेहऱ्याला पतीच्या निर्दयीपणामुळे ग्रहण लागलं. असं सांगितलं जातं की, एका पार्टीत संजय खान चांगलाच संतापला होता, त्याने भर पार्टीत झीनतला बेदम मारहाण केली. त्यावेळी झीनतच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली. तिचा चेहरा नेहमीसाठी बिघडला. यात तिचा एक डोळाही खराब झाला. त्यानंतर ती हळूहळू ग्लॅमर विश्वापासून दूर गेली.
4 / 7
सत्यम शिवम सुंदरममधील झीनत अमानच्या भूमिकेमुळे तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं होतं. त्यानंतर त्याच चेहऱ्याच्या वेदनादायी सत्याने झीनतचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.
5 / 7
असं म्हणतात की, 'अब्दुल्लाह' सिनेमादरम्यान झीनत आणि संजय खान यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांनी गुपचूपपणे लग्न केलं. पण साक्षीदार नसल्याने हे लग्न बेकायदेशीर मानलं गेलं, इतकंच नाही तर संजय खानही त्याने हे लग्न केलंच नाही असं म्हणाला होता. संजय खानने तिला इतकी वाईट जखम दिली होती की, ती त्यातून कधी बाहेर पडू शकली नाही.
6 / 7
झीनत अमानची आई महाराष्ट्रीन ब्राम्हण होती आणि तिचे वडील अमानुल्लाह खान भोपाळच्या राज परिवारातील होते. झीनत खरंच नाव झीनत खान आहे. तिच्या वडिलांनी दुसऱ्या लेखकांसोबत मिळून 'मुघल-ए-आझम' आणि 'पाकिजा' सारख्या सिनेमांच्या पटकथा लिहिल्या. एका लेखक म्हणून त्यांनी आपलं नाव 'अमान' ठेवलं होतं. झीनत सिनेमात आली तेव्हा तिने तिचं अमान हे नाव लावलं.
7 / 7
झीनत आयुष्य सोपं नव्हतं. ती लहान असतानाच तिचे आई-वडील वेगळे झाले. ती आईसोबत राहत होती. त्यानंतर तिच्या आईने एका जर्मन व्यक्तीसोबत लग्न केलं आणि ते जर्मनीला गेले. झीनतही आईसोबत तिथे गेली. तिला तेथील नागरिकता मिळाली. झीनतने तिच्या करिअरची सुरूवात एक पत्रकार म्हणून केली होती. तिने फेमिना फॅशन मॅगझिनमध्ये काम केलं. त्यानंतर ती मॉडलिंगमध्ये आली. १९ वर्षांची असताना तिने फेमिना मिस इंडिया आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हे किताब जिंकले. त्यानंतर ती देशात आणि परदेशातही लोकप्रिय झाली. बाकी पुढचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे.
टॅग्स :झीनत अमानबॉलिवूड