Join us

कशा अवस्थेत जगतेय संजय दत्तची दुसरी पत्नी? लिएंडर पेससोबत घेतलेला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 5:11 PM

1 / 6
लंडनमध्ये 1965 मध्ये जन्मलेली रिया पिल्लई मोठ्या घरातली आहे. रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंहगिर धनराजगिर ज्ञान बहादूर यांची नात आहे. रियाची आजी जुबैदा ही देशातील पहिल्या टॉकी फिल्म 'आलम-आरा'ची अभिनेत्री होत्या. रिया पिल्लईच्या वडिलांचे नाव रेमंड पिल्लई आहे, ते एक बिझनसमेन आहेत. तर आई दुर्रेश्वर धनराजगीरमधील नामवंत डॉक्टर आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 6
रिया चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी एक प्रसिद्ध मॉडेल होती. यासोबतच ती एअर होस्टेस देखील होती. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने मॉडेलिंगला आपले करिअर म्हणून निवडले. अनेक जाहिरातीत झळकलेली रिया ‘कॉर्पोरेट’ 2006 मध्ये आलेल्या एकाच चित्रपटात दिसली. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 6
मॉडेलिंगदरम्यानच रिया विवाहित संजय दत्तच्या जवळ आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय तुरुंगात असताना त्याची रियासोबतची जवळीक आणखी वाढली होती. रियाने संजयला खूप मोठा आधार दिला. या काळात ती संजयला भेटायला तुरुंगात जायची. तुरुंगात असताना मी रियाच्या प्रेमात पडलो, असे संजयने एका मुलाखतीत सांगितले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर व्हॅनेन्टाईन डे पार्टीत संजयने रियाला लग्नासाठी प्रपोज केले. यानंतर दोघांनी साईबाबा मंदिरात लग्न केले. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 6
लग्नानंतर संजयने सात चित्रपट साईन केलेत आणि आपल्या कामात बिझी झाला. तो इतका बिझी झाला की, रियाला वेळ देऊ शकला नाही. शूटींगमुळे माझी पर्सनल लाईफ संपलीय, अशी कबुली खुद्द संजयनेच दिली होती. पण यामागचे वास्तव काही वेगळेच होते. रिया टेनिस प्लेअर लिएंडर पेस(Leander Paes) ला डेट करू लागली होती. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 6
२००८ मध्ये संजय व रियाचा घटस्फोट झाला. यानंतर संजयने मान्यतासोबत लग्न केले आणि रिया लिएंडरसोबत राहू लागली. दोघांनी लग्नही केले. पण या लग्नाची गोष्ट त्यांनी जगापासून लपवून ठेवली. दोघांना एक मुलगी ही झाली. दहा वर्षानंतर दोघे वेगळे झाले. (फोटो इंस्टाग्राम)
6 / 6
५८ वर्षीय रिया पिल्लई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती लाईम लाईटपासून दूर राहते पण ती सोशल मीडिया ती तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
टॅग्स :संजय दत्तलिएंडर पेस