जान्हवी कपूरच्या Ex Boyfriendला डेट करतेय बहीण खुशी कपूर? कपूर सिस्टर्सना डेट करणारा अक्षत आहे तरी कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:50 PM1 / 9गॉर्जियस खुशी कपूर लवकरच डेब्यू करणार आहे. खुशी कपूरच्या पहिल्या फिल्म प्रोजेक्टबद्दल तुम्हाला माहिती असेलच. पण खुशीच्या लव्ह लाईफमध्ये काय चालले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. खुशी कपूरबद्दलच्या बातम्या येते आहे की, ती बहीण जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंड अक्षत राजनला डेट करत आहे. आता कोण आहे हा हँडसम हंक, जाणून घेऊया. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 9अक्षत राजन हा व्यवसायाने क्युरेटर, उद्योजक, इव्हेंट मॅनेजर आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 9अक्षत हा बिझनेसमन अभिजित राजन यांचा मुलगा आहे. अक्षत इंडस्ट्रीतील अनेकांना ओळखतो. चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या कुटुंबाशी अक्षतचे घट्ट नाते आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये जुना संबंध आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 9अक्षतने बॅचलर पदवीसह इंटरनॅशनल रिलेशन्स अँड अफेअर्स, इंटरप्रेन्यूल लीडरशिप आणि फिल्म अँड मीडिया स्टडीजचाही अभ्यास केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 9 वयाच्या 13व्या वर्षी अक्षत TEDx चा सर्वात तरुण व्यवाथापक बनला होता. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 9ऑगस्ट 2016 मध्ये जान्हवी कपूरसोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे अक्षत राजन चर्चेत आला होता. अक्षत आणि जान्हवीचे लिपलॉक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 9जान्हवी कपूरने अक्षयसोबतचं नातं कधीच ऑफिशियल केलं नाही. जान्हवी आणि अक्षतचे नाते तुटण्याचे कारण म्हणजे अभिनेत्रीची ईशान खट्टरसोबतची जवळीक असल्याचे सांगितले जाते. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 9ब्रेकअपनंतरही जान्हवी आणि अक्षत यांच्यातील मैत्री कायम आहे. जान्हवीनंतर अक्षत त्याची बहीण खुशीला डेट करत असल्याच्या बातम्या किती खऱ्या आहेत...हे आपल्याला लवकरच कळेल. (फोटो इन्स्टाग्राम)9 / 9खुशीने अक्षतसोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोघेही एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करतायेत.(फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications