पाकिस्तानची पहिली 'मिस युनिव्हर्स' एरिका रॉबिन नक्की कोण? सापडली वादात, होणार चौकशी By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 1:55 PM1 / 9Pakistan First Miss Universe Erica Robin: युएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेत कराचीच्या एरिका रॉबिनची पाकिस्तानसाठी मिस युनिव्हर्स म्हणून निवड झाली आहे. मात्र हे जेतेपद पटकावल्यानंतर बराच वाद निर्माण झाला आहे.2 / 9मिस युनिव्हर्स म्हणून एरिकाच्या निवडीवर पाकिस्तान सरकारने प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्नानंतर आता तिच्याबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जाणून घेऊया कोण आहे ती आणि काय आहे वाद?3 / 9ही सौंदर्य स्पर्धा दुबईच्या युजेन पब्लिशिंग अँड मार्केटिंग या बिझनेस ग्रुपने आयोजित केली होती. हा कार्यक्रम पाकिस्तानच्या नावाने आयोजित करण्यात आला होता आणि या प्रकरणी तिथल्या सरकारची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.4 / 9परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या नावाच्या वापराची दखल घेतली असून ते यूएई सरकारच्या संपर्कात आहेत. houseofyugen.com नावाची वेबसाइट आहे जिथे पाकिस्तानमधील 24-28 वयोगटातील महिलांना अर्ज करण्यास सांगितले होते.5 / 9या स्पर्धेद्वारे मिस युनिव्हर्स पाकिस्तान 2023 ची निवड होणार होती. सर्व अर्जांपैकी, कराचीच्या एरिका रॉबिनला मिस युनिव्हर्स पाकिस्तान 2023 घोषित करण्यात आले.6 / 9एरिका रॉबिन 24 वर्षांची असून ती पाकिस्तानची मॉडेल आहे. एरिकाचा जन्म 14 सप्टेंबर 1999 रोजी कराची, पाकिस्तानमध्ये झाला. एरिकाचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. 2014 मध्ये त्यांनी कराचीमधून पदवी घेतली.7 / 9एरिका दिसायला खूप सुंदर आहे आणि सुरुवातीपासूनच तिला फॅशन आणि मॉडेलिंगच्या जगात करिअर करायचे होते.8 / 92020 मध्ये एरिकाने मॉडेलिंगला सुरूवात केली. तिला पाकिस्तानच्या दिवा मॅगझिनमध्ये स्थान मिळाले. मॉडेलिंगमध्ये येण्यापूर्वी एरिकाने असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले होते.9 / 9एरिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे ४३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 18 नोव्हेंबर 2023 रोजी सॅन साल्वाडोर येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत एरिका पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications