कोण आहे युसूफ इब्राहिम? ज्याला देण्यात आली आलिया-रणबीरच्या लग्नाची सिक्युरिटीची जबाबदारी By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 1:46 PM1 / 8Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding: सध्या बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. सतत त्यांच्या लग्नाचे काहीना काही अपडेट्स समोर येत आहेत. दोघांचं लग्न कुठे हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर खानदानाचा बंगला कपूर हाऊसमध्ये होणार आहे. त्यामुळे इथे सुरक्षा व्यवस्थाही तेवढीच मोठी आहे. 2 / 8लग्नाच्या सिक्युरिटीबाबत आलियाचा भाऊ राहुल भट्ट याने माहिती दिली की, आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या सिक्युरिटीची जबाबदारी युसूफ भाईकडे देण्यात आली आहे. युसूफ भाई यांची मुंबईत '9/11' नावाने सिक्युरिटी एजन्सी आहे. याच एजन्सीचे जवळपास २०० बाऊंसर्स या लग्नाच्या सिक्युरिटीसाठी तैनात केले जातील. सोबत चांगल्या पर्सनॅलिटीचे, इंग्रजी बोलणारे, स्मोकिंग न करणारे गार्ड ठेवले जातील. चला जाणून घेऊन या लग्नाची सिक्युरिटी सांभाळणारे युसूफ भाई यांच्याबाबत...3 / 8सेलिब्रिटीजना सिक्युरिटीसाठी गार्ड्स आणि बॉडीगार्ड्सची नेहमीच गरज असते. जे त्यांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित ठेवतात. बॉडीगार्ड्सचं सेलिब्रिटींच्या जीवनात मोठं योगदान असतं. त्यामुळे त्यांची निवडही विचार करूनच केली जाते. जेणेकरून ते पुन्हा पुन्हा बदलायला लागू नये. जसे की, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा गेल्या २५ वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. 4 / 8सध्या आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सिक्युरिटीचं काम मिळालं आहे युसूफ इब्राहिम यांना. युसूफ इब्राहिम हे सेलिब्रिटींसाठी काही नवं नाव नाही. अनेक वर्षांपासून ते आलियाच्या सिक्युरिटीचे इन्चार्ज आहेत. ते नेहमीच आलियाला प्रोटेक्ट करताना दिसतात. 5 / 8आलियासोबतच युसूफ भाई बॉलिवूड आणि इंटरनॅशनल स्टार्सना सिक्युरिटी देतात. बॉलिवूडमध्ये ते शाहरूख खान, रणबीर कपूर, करण जोहर, शाहिद कपूर, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, कॅतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, सिद्धार्त मल्होत्रा यांचे सिक्युरिटी एन्चार्ज राहिले आहेत. 6 / 8इतकंच नाही तर युसूफ सनी लिओनी आणि तिच्या परिवाराच्या सिक्युरिटीचे इन्चार्ज आहे. रक्षा बंधनाला सनी लिओनी आणि तिची मुलगी निसा युसूफ भाई राखी बांधताना दिसली होती. ते सनी लिओनीची सिक्युरिटी बघतात.7 / 8अभिनेता वरूण धवनच्या लग्नावेळीही सिक्युरिटीची जबाबदारी युसूफ इब्राहिम यांनाच दिली गेली होती. वरूणने त्याची लॉंग टाइम गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत अलिबागमध्ये लग्न केलं होतं.8 / 8युसूफ इब्राहिम सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव राहत नाही. पण ते अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे इन्चार्ज राहिले आहेत. यावरून हे नक्की दिसतं की, रणबीर आणि आलियाच्या लग्नात कोणत्याही प्रकारची ढील राहणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications