1 / 15'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 2 / 15'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 3 / 15स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. 4 / 15सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.5 / 15मात्र आता स्मिताने सावळ्या रंगाचे फोटो शेअर केले आहेत.6 / 15तिने ब्राउन रंगाच्या स्कीनटोनमध्ये फोटो शूट केले आहे. तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे.7 / 15स्मिताने फोटो शेअर करत म्हटले ब्राउन इज ब्युटिफुल8 / 15त्वचेचा रंग कधीच तुमचे चारित्र्य ठरवू शकत नाही, असेही तिने म्हटले आहे. 9 / 15सौंदर्याला कोणताच रंग नसतो, असे तिने फोटोशूटसोबत म्हटले आहे.10 / 15स्मिताचे हे फोटो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. 11 / 15खरेतर या फोटोत स्मिताला ओळखताही येत नाही.12 / 15सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 13 / 15स्मिताला नेहमी वेगवेगळ्या भूमिका व गोष्टी करायला आवडतात.14 / 15स्मिता सांगते की, कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत. 15 / 15स्मिताचे हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार असल्याचे ती सांगते.