1993च्या बॉम्ब स्फोटानंतर संजय दत्त कपाळावर लावायचा लाल टिळा; 'हे' होतं त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 04:12 PM2023-05-15T16:12:55+5:302023-05-15T16:16:48+5:30

Sanjay dutt: काहींच्या मते, संजय स्टाइल म्हणून लावत होता. तर, काहींच्या मते, तो देवभोळा असल्यामुळे लावायचा. मात्र, प्रत्यक्षात एक वेगळंच कारण होतं.

आपल्या अभिनयशैलीसह स्टाइलमुळे बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे संजय दत्त.

संजय दत्तने ८०-९० चा काळ चांगलाच गाजवला. या काळात तरुणाई त्याला प्रत्येक गोष्टीत फॉलो करायची.

त्याकाळात संजयने कोणतीही गोष्टी केली ती तो ट्रेंड व्हायचा. यातलंच एक उदाहरण म्हणजे तो लावत असलेला कपाळावरील कुंकवाचा लाल टिळा.

१९९३ च्या काळात संजय कपाळावर लाल टिळा लावून फिरायचा. मात्र, तो हा टिळा नेमका का लावतो हे फार मोजक्या लोकांना ठावूक आहे.

काहींच्या मते, संजय स्टाइल म्हणून लावत होता. तर, काहींच्या मते, तो देवभोळा असल्यामुळे लावायचा. मात्र, प्रत्यक्षात तो एका वेगळ्याच कारणामुळे हा टिळा लावत होता.

१९९३ मध्ये संजयला मुंबई बॉम्बस्फोटा प्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्या धार्मिकतेवरही बोट उचलण्यात आलं होतं.

सर्व स्तरांमधून संजयवर टीकास्त्र डागलं जात होतं. त्यामुळे आपलं हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी तो लाल टिळा लावत होता.

त्या काळात संजयला अनेकांनी टीकेचा धनी केलं होतं. त्यामुळे संजयने आपलं हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा असा सल्ला त्याला वडील सुनील दत्त यांच्या काही निकटवर्तीयांनी दिला होता.

दरम्यान, संजय दत्तला ज्यावेळी पहिल्यांदा जामीन मिळाला त्यावेळी त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा असल्याचं पाहण्यात आलं होतं.