मी सेटवर फक्त रडायचे..., मालिकांमध्ये अभिनय करणं का सोडलं? उर्मिला निंबाळकरने सांगितलं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 1:07 PM1 / 11प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.2 / 11उर्मिला प्रसिद्ध युट्यूबर असण्यासोबतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे. तिने एक तारा, दिया और बाती या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 3 / 11'दुहेरी', 'बन मस्का' या मराठी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली. अर्थात आताश: उर्मिला फारशी टीव्हीवर दिसत नाही. याचं कारण काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.4 / 11आता उर्मिलाने याचं उत्तर दिलं आहे. नुकतंच थिंक बँक' या युट्युब चॅनलला उर्मिलानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीत मालिकांपासून दूर जाण्याचं कारण तिने सांगितलं.5 / 11ती म्हणाली, 'मी मालिकांमध्ये दिवसाचे १३ तास कमीतकमी तर १७ ते १८ तास सलग शूटिंग करायचे. सगळ्याच मालिकांच्या बाबतीत असंच आहे, इतकंच काम करावं लागणार, असं माझ्या लक्षात आलं.'6 / 11ती पुढे म्हणाली, ' सलग १७ ते १८ तास शूटींगचा तब्येतीवर परिणाम जाणवू लागला होता. अगदी आजारी पडलं तरी गोळ्या खाऊन, सलाईन लावून काम करायला लागायचं.'7 / 11ती म्हणाली, 'मला भरपूर काम मिळत होतं पण मला ते करायचं नव्हतं. अशा पद्धतीने काम करणं मला मान्य नव्हतं. त्यात ना आनंद होता, ना स्वत:चं वेगळं आयुष्य होतं.'8 / 11'मी ते काम करून अजिबात खुश नव्हते, मी सेटवर जाऊन फक्त रडायचे. आईबाबांना कायम मला दवाखान्यात भेटायला यायला लागायचं. त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला,' असं तिने सांगितलं.9 / 11आता उर्मिला एक लोकप्रिय युट्यूबर म्हणून ओळखली जाते. युट्यूबवर तिने 8 लाख सब्स्क्राइबर्सचा टप्पा पार केला आहे10 / 11 मुख्य म्हणजे स्वत:चा स्टुडिओ बनवणारी मराठीतील पहिलीच युट्यूबर ठरली आहे. युट्युब वर ट्रॅव्हल, लाईफ स्टाईल, स्किन केअर ते अगदी रोजच्या आयुष्यातील खास टिप्स ती देत असते.11 / 11उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमास्तेसोबत लग्नगाठ बांधली. ती एका मुलाची आई आहे. सध्या ती आईपण एन्जॉय करतेय. आणखी वाचा Subscribe to Notifications