Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:32 AM1 / 7अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी १९ वर्षांपूर्वी आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला करिअरला सुरुवात केली होती. सुरुवातीला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पंकज त्रिपाठी यांनी मेहनतीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. 2 / 7आज प्रत्येक चित्रपट निर्मात्याला त्यांच्यासोबत काम करायचे आहे. पंकज त्रिपाठी यांना केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतूनही खूप ऑफर्स येत आहेत. परंतु सध्या त्यांना आपण साऊथच्या चित्रपटात काम करू नये असे वाटत आहे. त्यांनी अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही रिजेक्ट केल्या आहेत.3 / 7२००३ मध्ये त्रिपाठी यांनी कन्नड चित्रटातूनच आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दिला सुरूवात केली होती. तरी त्यांना साऊथच्या चित्रपटांत का काम करायचं नाहीये? मध्यंतरी त्यांनी एका तेलुगू आणि तामिळ चित्रपटातही अभिनय साकारला होता. त्यांना केवळ साऊथच्याच नाही हॉलिवूड किंवा अन्य कोणत्याही भाषेतील चित्रपटात त्यांना काम करायचं नाहीये. गोव्यात सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्ल दरम्यान बोलताना त्यांनी याचं कारण सांगितलं आहे. नवभारत टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.4 / 7“भाषा ही माझ्यासाठी काही समस्या नाही. परंतु मी हिंदी चित्रपटाला प्राधान्य देतो. कारण ती भाषा आवडीचीही आहे आणि मला ती कळतेही. त्याच्या भावना, त्यातील सूक्ष्म गोष्टी मी चांगल्यारित्या समजतो,” असं पंकज त्रिपाठी म्हणाले. 5 / 7“भाषा ही माझ्यासाठी काही समस्या नाही. परंतु मी हिंदी चित्रपटाला प्राधान्य देतो. कारण ती भाषा आवडीचीही आहे आणि मला ती कळतेही. त्याच्या भावना, त्यातील सूक्ष्म गोष्टी मी चांगल्यारित्या समजतो,” असं पंकज त्रिपाठी म्हणाले. 6 / 7“हॉलिवूड विसरून जा, मला तेलुगू, मल्याळम चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या आहेत. परंतु मी त्या चित्रपटांसोबत न्याय करू शकतो असं वाटत नाही. कारण मी त्या भाषा बोलू शकत नाही,” असंही त्यांनी नमूद केलं. 7 / 7परंतु जर कोणत्या अन्य भाषेतील चित्रपटामध्ये हिंदी बोलणारं पात्र ऑफर केलं तर कोणत्याही भाषेतील चित्रपटातील त्या भूमिका नक्की साकारू, असंही त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं. पंकज त्रिपाठी आगामी ओह माय गॉड या चित्रपटात दिसणार आहेत. तसंच त्यांनी यावर्षी शेरदिल सोबतच क्रिमिनल जस्टिस या वेबसीरिजमध्येही भूमिका साकारली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications