१६ वर्षाचा संसार, दोन मुली, जाणून घ्या का तुटलं फरहान अख्तरचं पहिलं लग्न? By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 10:38 AM1 / 8गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर जोडीने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. १९ फेब्रुवारीला त्यांचं लग्न होत आहे. दोघांचे लग्नाच्या रिती-रिवाजांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2 / 8फरहान आणि शिबानी खडाळ्यातील एका फार्महाउसवर सात फेरे घेतील. दोघांसाठी ही फारच आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं सुरू असताना फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानी हिचंही नाव समोर येत आहे.3 / 8२०१६ मध्ये फरहान आणि अधुना यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. १६ वर्षाच्या लग्नातून त्यांना दोन मुली आहेत. अधुना भबानी व्यवसायाने सेलिब्रिटी हेअरस्टायलिश आहे. 4 / 8अधुनाचा जन्म लंडनमध्ये झाला आहे. फरहानपेक्षा ती सहा वर्षाने मोठी आहे. अधुना बी ब्ंलंट नावाने सलूनची फ्रॅंचायजी चालवते. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान आणि अधुनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 5 / 8अधुना आणि फरहान यांना शाक्या आणि अकीरा अशा दोन मुली आहेत. फरहान आणि अधुनाची पहिली भेट १९९७ मध्ये झाली होती. जुहूच्या एका नाइट क्लबमध्ये दोघे भेटले होते. त्यावेळी फरहान 'दिल चाहता हैं'' सिनेमात काम करत होता.6 / 8फरहानचा हा पहिला सिनेमा होता आणि यातून तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करत होता. फरहान आणि अधुनाची पहिली भेट फारच कमी वेळासाठी झाली होती. त्यानंतर फरहानची बहिण झोयाने अधुनाला भेटायला बोलवलं होतं.7 / 8फरहान दिल चाहता है सिनेमाचा दिग्दर्शक होता. तर अधुना हेअरस्टायलिश होती. दोघांनी तीन वर्ष एकमेकांना डेट केलं आणि २००० साली त्यांनी लग्न केलं. 8 / 8फरहानचं काही अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. ज्यात अदिती राव हैदरी आणि श्रद्धा कपूर यांचा समावेश आहे. त्यानंतर तो शिबानी दांडेकरसोबत अनेक ठिकाणी दिसला होता. रिपोर्ट्सनुसार, शिबानी दोघांमध्ये अंतर निर्माण होण्याला कारण ठरत होती. आणखी वाचा Subscribe to Notifications