५३ वर्षांची तब्बू अजूनही का आहे सिंगल? लग्न का केलं नाही? हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:41 IST
1 / 9तब्बू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनय आणि सौंदर्याने तिने ९०चं दशक गाजवलं. 2 / 9'प्रेम', 'कोहराम', 'बॉर्डर', 'बीवी नंबर १', 'साजन चले ससुराल', 'हिंमत', 'कूली नं १' हे तिचे गाजलेले सिनेमे. 3 / 9बॉलिवूडमधील करिअरमध्ये तब्बूचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं. पण, ५३व्या वर्षीही तब्बू अद्याप सिंगलच आहे. 4 / 9तिला अनेकदा मुलाखतीत लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांना उत्तर देत तिने लग्न न करण्यामागचं खरं कारण सांगितलं होतं. 5 / 9'लोकांना माझ्या आयुष्यात का डोकवायचं आहे? या प्रश्नांना काहीही अर्थ नाही', असं ती म्हणाली होती. 6 / 9लग्नाबद्दलच्या प्रश्नांनी काहीही फरक पडत नाही आणि हा तितका विचार करण्याचा विषय नाही, असंही तब्बू म्हणाली होती. 7 / 9एका मुलाखतीत लग्नाबद्दल विचारताच तब्बू म्हणाली, 'माझं सायकोलॉजिकल अनालिसिस का करायचं आहे? हा प्रश्न बोरिंग आहे'. 8 / 9दरम्यान, गेल्या वर्षी तब्बू 'क्रू', 'औरो मे कहाँ दम था' या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 9 / 9आता ती 'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा सिनेमा २०२६मध्ये प्रदर्शित होणार आहे.