Yami Gautam Birthday: यामी गौतमने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, आता फोटो होताहेत व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:21 AM1 / 5अभिनेत्री यामी गौतम हिने रविवारी तिचा वाढदिवस कुटुंबामध्ये धुमधडाक्यात सारजा केला. आता या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस असल्याने यामीसाठी हा वाढदिवस खास होता. 2 / 5यामीने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिने पती आदित्य धर याचे आभार मानले आहेत. तसेच आदित्यसारखा जोडीदार लाभल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते, असेही यामीने सांगितले. 3 / 5यामीला मोठे सोहळे करायला आवडत नाही. ती कुटुंबासह साधेपणाने वाढदिवस साजरा करते. तिची हीच गोष्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते. 4 / 5बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने याचवर्षी आदित्य धर याच्याशी विवाह केला होता. तेव्हा यामीने लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना धक्का दिला. कारण यामीने तिचे आदित्यसोबतचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. 5 / 5यामी गौतम ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असून, तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications