Happy Birthday Yami : यामी गौतमला व्हायचे होते आयएएस, मग कशी झाली बॉलिवुड एंट्री? By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 1:26 PM1 / 7यामी गेल्या अनेक दिवसांपासून एका आजाराशी झुंज देत आहेत. ksratosis-pilaris केराटोसिस पिलारिस हा एक त्वचेचा आजार आहे. या आजारावर कोणताच उपाय अजुन आलेला नाही. त्यामुळे आता मी या आजाराला स्वीकारले आहे. यामध्ये चेहऱ्यावर लहान लहान पुरळं येतात. अनेक वर्षे हे सहन केल्यानंतर मी याचा स्वीकार केला.2 / 7खूप कमी जणांना माहित आहे यामी ने हिंदी मालिकेतुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'चांद के पार चलो' ही तिची पहिली मालिका. त्यानंतर राजकुमार आर्यन मध्ये तिने काम केले. तर कलर्स च्या 'ये प्यार ना हो गा कम' या मालिकेमुळे तिला ओळख मिळाली.3 / 7यामी ला आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती. मात्र जे नशिबात असते तेच होते.आज यामी एक सुपरहिट अभिनेत्री आहे.यामीच्या वडिलांच्या मित्राची पत्नी टेलिव्हिजन अभिनेत्री होती. त्यांनी यामीमधले टॅलेंट हेरले. त्यांनी यामीला थिएटर जॉइन करण्याचा सल्ला दिला. 4 / 7त्यांनी यामीचे काही फोटो मुंबईतील अनेक प्रोडक्शन हाऊसमध्ये पाठवले. यानंतर यामीने मॉडेलिंग सुरु केले. 5 / 7मालिकांनंतर यामीला पहिली जाहिरात मिळाली ती 'फेअर अॅंड लव्हली'ची. फेअर अॅंड लव्हली जाहिरातीतुन यामीचा चेहरा घराघरात पोहोचला.6 / 7२०१२ साली यामीने विकी डोनर सिनेमातुन यामीने डेब्यु केले. याशिवाय यामीने कन्नड सिनेमा उल्लास मध्ये देखील काम केले आहे. हा सिनेमा २००९ मध्ये आला होता. इतकेच नाही तर यामीने पंजाबी आणि तेलगु सिनेमातही काम केले आहे.7 / 7२०२१ मध्ये यामीने निर्माता आदित्य धर शी लग्न केले. कोरोना वेळी त्यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. यावेळी यामीचा लुक सुद्धा अगदी साधा होता. आणखी वाचा Subscribe to Notifications