PHOTOS : हळद, मेहंदी ते विवाह...! पाहा, यामी गौतमचा वेडिंग अल्बम By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 1:15 PM1 / 11अभिनेत्री यामी गौतमने ४ जून रोजी अचानक विवाहाची बातमी देत सगळ्यांनाच आनंदाचा धक्का दिला होता.2 / 11यामी 4 जूनला आदित्य धर याच्यासोबत गुपचूप लग्नबंधनात अडकली. या विवाह सोहळ्याचा पहिला फोटो समोर आल्यानंतर या लग्नाबद्दल सर्वांना कळले होते.3 / 11आता यामीने तिच्या विवाह सोहळ्यांचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत.4 / 11लॉकडाऊनमुळे अगदी 18 लोकांच्या उपस्थितीत यामीने लग्नगाठ बांधली. हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे यामीचा विवाहसोहळा पार पडला.5 / 11 यामीचा पती आदित्य धर हा दिग्दर्शक व गीतकार आहे. आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.6 / 11नवीन वधूच्या रूपात दिसत आहे. साडी, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या परिधान केलेली यामी खूप सुंदर दिसत आहे.7 / 11यामी आणि आदित्यनं आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. दोघांनाही एकमेकांवर प्रेम आहे हे कुणालाही कळू दिलं नाही.8 / 11यामी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही आणि यामुळेच यामी आणि आदित्यच्या लग्नामुळे केवळ चाहतेच नव्हे तर सेलेब्रिटींनाही धक्का बसला.9 / 11 या फोटो यामी होणा-या पतीकडे बघून हसतेय. यात ती कमालीची सुंदर दिसतेय.10 / 11 हळदीचा एक फोटो यामीने शेअर केला आहे. यात ती खळखळून हसताना दिसतेय.11 / 11मेहंदीमध्ये यामीनं गडद पिवळ्या रंगाचा शेड सूट परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. या सोहळ्यात आदित्यही यामीबरोबर होता. आणखी वाचा Subscribe to Notifications