Join us

मोहितची रिअल लाइफ स्वीटू आहे तितकीच गोड आणि सुंदर; पाहा कोण आहे त्याची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 1:00 PM

1 / 9
छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
2 / 9
या मालिकेत मालविकासोबत खलनायकाची भूमिका साकारणारा मोहितदेखील लोकप्रिय ठरला. मोहितची भूमिका अभिनेता निखील राऊत (Nikhil Raut) याने साकारली आहे.
3 / 9
खानविलकरांची संपत्ती मिळावी यासाठी स्वीटूसोबत लग्न करणाऱ्या मोहितची रिअल लाइफ स्वीटूदेखील तितकीच सुंदर आणि साधी आहे.
4 / 9
सध्या सोशल मीडियावर निखीलच्या रिअल लाइफ स्वीटूबद्दल चर्चा होत आहे. निखीलची खऱ्या आयुष्यातली पत्नी कोण? ती कशी दिसते याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
5 / 9
निखीलच्या पत्नीचं नाव मयुरी राऊत असं असून ती उत्तम नृत्यांगना आहे.
6 / 9
सोशल मीडियावर सक्रीय असलेली मयुरी अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते.
7 / 9
२२ एप्रिल २०१४ रोजी निखिलने मयुरीशी लग्नगाठ बांधली. मयुरी एक शास्त्रीय नृत्यांगना आहे.
8 / 9
निखील अनेकदा सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.
9 / 9
निखीलने त्याच्या पत्नीसाठी खास बर्थ डे सेलिब्रेशन केलं होतं.
टॅग्स :टेलिव्हिजननिखिल राऊतटिव्ही कलाकार