Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 10:13 AM1 / 10गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियालवर अभिनेता विका कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे दोघंही डिसेंबरच्या अखेरीस राजस्थानमधील एका पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.2 / 10सध्या सोशल मीडियावर जरी विकी आणि कतरिनाच्या अफेअर किंवा लग्नाची चर्चा सुरु असली. तरीदेखील नेटकऱ्यांमध्ये विकीच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा रंगू लागली आहे.3 / 10कतरिनाला डेट करण्यापूर्वी विकी अभिनेत्री हरलीन सेठी हिला डेट करत होता. विशेष म्हणजे त्यांचं रिलेशन चांगलं गाजलंही होतं. 4 / 10२०१९ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, अजूनही त्यांच्या रिलेशनची चर्चा रंगते. त्यातच विकी-कतरिनाच्या लग्नामुळे हरलीनदेखील पुन्हा चर्चेत आली आहे. 5 / 10विकी आणि हरलीनमध्ये छान बॉण्डिंग होतं. मात्र, 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाच्या यशानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं. याविषयी एका मुलाखतीत हरलीनने तिचं मतही मांडलं होतं.6 / 10'उरी'च्या यशानंतर विकीला हरलीनचा विसरल पडला होता', असं तिने या मुलाखतीत सांगितलं होतं. तसंच 'मला कोणाची एक्स गर्लफ्रेंड अशी ओळख नकोय', असंही ती म्हणाली होती.7 / 10हरलीन छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं आहे. 8 / 10हरलीनने केवळ भारतीय नव्हे तर हॉलिवूडमध्येही काम करुन तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.9 / 10हरलीन सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिचा चाहतावर्गदेखील तितकाच मोठा असल्याचं पाहायला मिळतं.10 / 10'ब्रोकेन बट ब्यूटीफुल' या वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत विक्रांत मेस्सीने स्क्रीन शेअर केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications