'तुझे करिअर बर्बाद होईल !'; सैफ अली खानसोबत लग्न करण्याआधी करीना कपूरला दिला होता हा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 1:45 PM1 / 8एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी २०१२ साली लग्न केले.2 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अभिनेत्रीच्या जवळच्यांना सैफ अली खान सोबत लग्न करत असल्याचे समजल्यावर त्यांनी अभिनेत्रीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला.3 / 8करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकांनी तिला इतकेच सांगितले की सैफ घटस्फोटित आहे, दोन मुलांचा बाप आहे, तू खरंच सैफशी लग्न करणार आहेस का?4 / 8इतकंच नाही तर करीनाला काही लोकांनी असंही सांगितलं की सैफशी लग्न केल्याने तिचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. 5 / 8त्यानंतर करीनाने विचार केला की, प्रेम करणं हा खरंच इतका मोठा गुन्हा आहे का? लग्न झाल्यावर काय होते ते पाहूया. 6 / 8मात्र, आज सैफ आणि करीना दोघेही इंडस्ट्रीतील पॉवर कपल्समध्ये गणले जातात. 7 / 8सैफ आणि करीनाला दोन मुले आहेत, मोठ्या मुलाचे नाव तैमूर अली खान आहे, तर लहान मुलाचे नाव जहांगीर अली खान आहे.8 / 8करीना कपूर लवकरच लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications