चहलची पत्नी धनश्री वर्मावर यशस्वी शस्त्रक्रिया! हॉस्पिटलमधूनच केला फोटो शेअर, पती युजवेंद्रची कमेंट चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 1:04 PM1 / 6Yuzvendra Chahal Dhanashree Verma: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी मॉडेल-प्रोफेशनल डान्सर धनश्री वर्मा यांच्यात काही तरी बिनसलं असल्याची चर्चा होती. या चर्चांना गेल्या काही दिवसात प्रचंड उधाण आले होते. सुरूवातीला चहल पती-पत्नींनी एक छोटासा मेसेज इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करून या साऱ्या अफवा असल्याचे सांगितले होते.2 / 6असे करूनही तरीही या चर्चांना पूर्णविराम मिळाला नव्हता. त्यानंतर धनश्री वर्माने भली मोठी सोशल मीडिया पोस्ट लिहीत सत्यपरिस्थिती सर्वांसमोर मांडली होती. त्यात धनश्रीने, तिच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, नुकतीच तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.3 / 6टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सध्या रुग्णालयात आहे. तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. खुद्द धनश्रीने हॉस्पिटलमधील फोटो शेअर करताना ही माहिती दिली आहे. धनश्रीच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात आली.4 / 6धनश्री आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटसाठी एक डान्स व्हिडीओ शूट करत होती, त्यावेळी डान्स करतानाच ती पडली आणि त्यावेळी तिच्या गुडघ्याला लागलं. धनश्रीचे लीगमेंट तुटल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिला वेळीच गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. वेळीच शस्त्रक्रिया न केल्यास आयुष्यात पुन्हा कधीही नृत्य करता येणार नाही, असेही तिला सांगितले होते.5 / 6हॉस्पिटलच्या बेडवरून आपला फोटो शेअर करत धनश्रीने लिहिले की, 'शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आयुष्यातील प्रत्येक धक्का हा एका उत्तम पुनरागमनासाठी आपल्याला सज्ज करतो. आता मी नक्कीच दमदार पुनरागमन करेन, कारण हा देवाचाच प्लॅन आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार.'6 / 6चहलनेही धनश्रीच्या या फोटो पोस्टवर कमेंट केली आहे. हार्ट चा इमोजी कमेंट करत त्याने लिहिले की, 'बायको, लवकर बरी हो.' याशिवाय भारतीय स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रीती नारायण, यशस्वी जैस्वाल, राजस्थान रॉयल्स यांनी धनश्रीला झटपट तंदुरूस्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications