Join us

IN PICS : ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले त्यानेच छळले...! झीनत अमानचे ‘वादळी’ आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 8:00 AM

1 / 13
हिंदी चित्रपटसृष्टीत एकेकाळ ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री झीनत अमान हिचा आज (19 नोव्हेंबर) वाढदिवस आहे.
2 / 13
हरे कृष्णा हरे राम , सत्यम् शिवम् सुंदरम् यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
3 / 13
1970 साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमानने लॉस एंजलिमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते़ यानंतर मॉडेलिंग क्षेत्रातून तिनेआपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
4 / 13
1971साली ओ.पी. राल्हन यांच्या ‘हलचल’ या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
5 / 13
80 च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या. त्यादरम्यानच्या काळात मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
6 / 13
मात्र 1979 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा होत्या. याचदरम्यान दोघांनी ‘अब्दुल्ला’ या सिनेमात एकत्र काम केले होते. चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर झीनत दुस-या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली. त्यावेळी संजय यांनी फोनवरुन झीनतला गाणे शूट करण्यास सांगितले. मात्र व्यस्त शेड्यूल्डमुळे झीनतने नकार दिला.
7 / 13
झीनतच्या नकारामुळे संजय भडकले त्यांनी झीनतला खूप बरेवाईट सुनावले. संजयचा फोन ठेवल्यावर घाबरुन झीनत त्यांच्या घरी गेली. त्यावेळी संजय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्याचे झीनतला कळले. झीनत तेथे पोहोचली. एका मॅगॅझिनमध्ये आलेल्या वृत्तानुसार चिडलेल्या संजय खान यांनी रागात झीनत यांना मारहाण केली. त्यांनी तिला इतकी जबर मारहाण केली की, झीनताच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या एका डोळ्याची दृष्टी कमी झाली. इतकेच नाही तर झीनत यांना दिवसातून तीन वेळा एन्टी डिप्रेसेंट्सचे औषधही घ्यावे लागायचे.
8 / 13
या घटनेनंतर झीनत आणि संजय खान यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते.त्यानंतर तिने मजहर खान यांच्याशी लग्न केले. संजय खान यांनी ‘द बिग मिस्टेक आॅफ माय लाईफ’ या आपल्या बायोग्राफीत या घटनेचा उल्लेख केला आहे.
9 / 13
1985 मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्यासोबत लग्न केले. पण झीनत आणि मजहर यांचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते. 1979 मध्ये प्रदर्शित ‘संपर्क’ या चित्रपटातून मजहर खान यांनी डेब्यू केला होता. अनेक चित्रपट करूनही मजहर यांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते. याचदरम्यान मजहर आणि झीनत एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्न केले. पण लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांमध्येही वाद होऊ लागलेत. असे म्हणतात की, मजहर झीनत यांना मारहाण करायचे.
10 / 13
दोन मुले आणि पत्नी असताना मजहर यांनी रूबिना मुमताजसोबत दुसरे लग्न केले. ही गोष्ट झीनत यांच्या जिव्हारी लागली आणि झीनत यांनी मजहर यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत मजहर किडनीच्या आजाराने अंथरूणाला खिळले होते. घटस्फोट होण्याआधीच मजहर यांचे निधन झाले.
11 / 13
करिअर यशोशिखरावर असताना खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक चढ उतार पाहावे लागले. 70 च्या दशकात झीनतची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकत होती.
12 / 13
झीनतला बॉलिवूडमध्ये ‘झीनी बेबी’ म्हणूनही ओळखले जायचे. ‘हरे राम हरे कृष्णा’च्या सेटवर देवानंद तिला याच नावाने हाक मारायचे. यानंतर अनेकजण तिला याच नावाने बोलवू लागलेत.
13 / 13
हॊमबॉलीवुडmazhar khan death anniversary he used to beat zeenat aman badly झीनत अमान यांना हवा होता घटस्फोट, पण त्याआधीच झाला पतीचा मृत्यू बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांचे पती आणि अभिनेते मजहर खान यांचे 1998 मध्ये आजच्याच दिवशी निधन झाले होते. By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: September 16, 2019 01:33 PM | Updated: September 16, 2019 01:37 PM ठळक मुद्दे दोन मुले आणि पत्नी असताना मजहर यांनी रूबिना मुमताजसोबत दुसरे लग्न केले. बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांचे पती आणि अभिनेते मजहर खान यांचे 1998 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 16 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले होते. 1985 मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्यासोबत लग्न केले. पण झीनत आणि मजहर यांचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते. 1979 मध्ये प्रदर्शित ‘संपर्क’ या चित्रपटातून मजहर खान यांनी डेब्यू केला होता. अनेक चित्रपट करूनही मजहर यांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते. याचदरम्यान मजहर आणि झीनत एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्न केले. पण लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांमध्येही वाद होऊ लागलेत. असे म्हणतात की, मजहर झीनत यांना मारहाण करायचे. एका मुलाखतीत झीनत यांनी मजहर यांच्याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मजहरला भेटल्यानंतर खरे प्रेम मिळाल्याचे मला वाटते होते. याचमुळे मी मजहरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईचा या नात्याला विरोध होता. पण तरीही मी मजहरसोबत लग्न केले.
टॅग्स :झीनत अमान