आमीर अनुष्का विधू विनोद चोप्रा आणि राजू हिरानी जेव्हा "पीके"ला घेऊन "लोकमत"ला भेटतात. वर्ष सरत असताना प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातलेली सर्वाधिक चर्चेतली कलाकृती म्हणून पीकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना तिला आकार देणार्या चौघांना भेटणे हा उपस्थितांसाठी अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता.
""अरे यार उस ट्रान्झिस्टर से इतना मत डरना आप जब फिल्म देखेंगे तो पक्का आपको पता चलेगा की इसमे मैने कोई गलत बात नही की है."" असं आमीर खान गालातल्या गालात हसत सांगितलं.
या शुक्रवारी पडद्यावर अवतरणारा पीके कोण आहे? तो असा का आहे? या उत्सुकतेने मुंबईच्या ताज लेण्ड्स एण्डमध्ये जमलेल्या "लोकमत परिवारा"ला उत्तरांऐवजी मिळाले ते नवे प्रश्न आणि बॉलीवूडमधल्या सध्याच्या "द बेस्ट टीम"ला पुरत्या पछाडून टाकणार्या पीकेच्या अजब दुनियेचे काही धमाल नजारे.
""ये पीके है कौन? एलीयन है क्या? उसके कपडे इतने क्यू चमकीले है? वो ऐसे क्यूं देखता है? या प्रश्नांना अजिबात न देता अब क्या बताऊं? बस इतना समझीये की आप जब उसे मिलेंगे तोही आपको पता चलेगा."" असं उत्तर मिळालं.
एका बाजूला "आमीर सर" आणि दुसरीकडे "राजू सर" यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करताना प्रत्येक क्षणी कसे आयुष्यभराचे शहाणपण मिळते हे सांगणारी अनुष्का कृतज्ञतेने अखंड भारावलेली होती.
बॉलीवूडच्या कुठल्याही चौकटीत न मावणारे पीके नावाचे एक अजब पात्र उभे करणे हे माझ्या आजवरच्या प्रवासातले सर्वांत कठीण आव्हान होते अशी कबुली देणारा आमीर "परफेक्शनको इम्प्रूव्ह करना कितना मुश्कील होता है" हे सांगताना राजू हिरानी नावाच्या "क्रिएटिव्हिटी"समोर उभे राहणे कसे परीक्षा पाहणारे असते याचे वर्णन करत होता.
""हम लोग नाटक-वाटक करते थे और "लोकमत"मे जाके रिक्वेस्ट करते थे की साब कुछ तो लिखिये हमारे बारे मे""- धडपडीच्या वयातली ही आठवण राजू हिरानींनी सांगितली तेव्हा आमीर खानसह सर्वांनीच या अनोख्या योगायोगाला दिली.
आधी इंजिनीअरिंग सोडून कॉर्मसचा रस्ता धरलेल्या राजू हिरानीने वडिलांसमोर जाऊन मी सी.ए.ची परीक्षा देणार नाही मला सिनेमात जायचे आहे"" हे सांगण्याची हिंमत केली. आणि मान खाली घालून आपल्या भविष्याचा फैसला ऐकला.थेट "थ्री इडियट्स"मधून उचलून आणल्यासारखा वाटावा असा हा प्रसंग राजू हिरानींच्या आयुष्यात घडला.