Join us  

पडद्यावरचे विमान अपहरण

By admin | Published: February 20, 2016 2:20 AM

रान माधवांनी दिग्दर्शित व सोनम कपूरच्या मुख्य भूमिकेतील ‘नीरजा’ या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. एअरहोस्टेस्ट नीरजा भानोत हिने केलेल्या पराक्रमाची गाथा सांगणारा

रान माधवांनी दिग्दर्शित व सोनम कपूरच्या मुख्य भूमिकेतील ‘नीरजा’ या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. एअरहोस्टेस्ट नीरजा भानोत हिने केलेल्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट सर्वस्तरातून प्रसंशा मिळवित आहे. 1986 साली झालेल्या विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. मुंबई विमानतळावरून न्यूयॉर्कला जाणाऱ्या PAN AM 73 विमानाचे पाकिस्तानातील कराचीच्या एम जिन्ना विमानतळावरून अपहरण करण्यात आले होते. 360 प्रवाशांना वाचविताना २३ वर्षीय नीरजा भानोत शहीद झाली. विमान अपहरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. यात मल्याळम भाषेतील अमिताभ बच्चन व मोहनलाल यांच्या प्रमुख भूमिके चा ‘कंधार’ व तामिळ व तेलगू भाषेत प्रदर्शित झालेला नागर्जून अभिनित ‘गगनम’ यांचाही उल्लेख करता येईल. विमान अपहरण या विषयावर स्पेशल बॉलीवूड चित्रपट देखील पडद्यावर आले आहेत; त्यावर एक नजर...जमीन (2003)रोहित शेट्टी दिग्दर्शित हा पहिला चित्रपट होता. अजय देवगन, अभिषेक बच्चन व बिपाशा बसू यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट चांगल्या पटकथेसाठी लक्षात राहतो. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा सरकत जाते. दहशतवादी आपल्या नेत्याला सोडण्याच्या मागणीसाठी विमान अपहरण करतात. या चित्रपटाची कथा डिसेंबर 1999 साली झालेल्या कंधार विमान अपहरणावर आधारित होती. हायजॅक (2008)शायनी अहुजा, ईशा देओल व दाक्षिणात्य अभिनेत्री अनुषा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा हॉलीवूडच्या ‘डाय हार्ट’ या चित्रपटासारखी होती. डाय हार्टप्रमाणे अ‍ॅक्शन यात नसली तरीदेखील तसा प्रयत्न दिग्दर्शकाने केला होता. सहा दहशतवादी विमानांचे अपहरण करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रवाशांची हत्या करतात. ‘आयसी 814’ या विमान अपहरणावर या चित्रपट तयार करण्यात आला होता. ये दिल आशिकाना (2002)दिग्दशक कुकू कोहली यांच्या रोमँटिक-अ‍ॅक्शन ‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटात करण नाथ व जीविका शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा दोन ट्रॅकवर पुढे सरकत जाते. कॉलेजचे रोमँटिक वातावरण तर दुसरीकडे दहशतवादी कारवाया. ज्या विमानातून नायिका प्रवास करीत असते त्याचे अपहरण होते.