‘रंगभूमीवर काम करणे जास्त आव्हानात्मक’
By Admin | Published: January 25, 2017 02:43 AM2017-01-25T02:43:24+5:302017-01-25T02:43:24+5:30
स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून अभिनेत्री गौरी नलावडे ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. यानंतर ती कान्हा या चित्रपटातदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून अभिनेत्री गौरी नलावडे ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. यानंतर ती कान्हा या चित्रपटातदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रेक्षकांची हीच लाडकी अभिनेत्री आता आपल्या अभिनयाची चुणूक रंगभूमीवर सादर करताना दिसत आहेत. हे तिचे पहिलेच नाटक आहे. त्यामुळे रंगभूमीविषयी काय अनुभव आहे, याविषयी तिने लोकमत सीएनएक्सशी साधलेला संवाद...
स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून तू घराघरात पोहोचली, प्रेक्षक पुन्हा तुला टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत, याविषयी काय सांगशील?
ल्ल छोट्या पडद्यावर पुन्हा मला चांगली संधी मिळाली तर नक्कीच मी छोट्या पडद्यावर काम करेन. मी स्वत:देखील काम करण्यास उत्सुक आहे. तसेच आता सध्या एका चित्रपटाविषयीची तयारी चालू आहे. वेळ आली तर नक्कीच सांगेन.
मालिका, चित्रपटानंतर तुला नाटक का करावेस वाटले?
ल्ल चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, एक दोन नाटकांची आॅफर आली होती. पण मी नाटक करण्यास तयार नव्हते. मात्र काही तरी नवीन करायचे, म्हणून दिग्दर्शकाला नाटकाची स्क्रीप्ट पाठविण्यास सांगतिली. खरं सांगू का, ती स्क्रीप्ट वाचल्यावर त्या विषयाच्या प्रेमातच पडले. यानंतर लगेच मी नाटक करण्यास होकार दिला.
पहिल्या नाटकाचा अनुभव कसा होता?
ल्ल खरचं माझ्या पहिल्या नाटकाचा अनुभव खूपच छान होता. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे अधिक आनंद होत आहे. आमच्या नाटकाची टीमदेखील खूप छान आहे. या सर्वांकडून खूप काही शिकण्यास मिळत आहे. तसेच काही तरी वेगळं आणि नवीन काही करण्यास मिळाले. त्याचबरोबर लाइव्ह परफॉर्मन्स मी कधीच केलेला नाही. त्यामुळे मला नाटक हे करायचे होतेच.
नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये तुला जास्त काय आव्हानात्मक वाटले?
ल्ल मालिका आणि चित्रपटांपेक्षा मला नाटक करणे हेच जास्त आव्हानात्मक वाटले. कारण मालिका आणि चित्रपटांमध्ये रिटेक घेता येते. मात्र नाटक करताना रिटेक नावाचा प्रकारच नसतो. तसेच रंगभूमीवर मिळणारा प्रतिसाद हा तुम्हाला थेट मिळत असतो. पहिल्यादांच रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर लाइव्ह परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली. तसेच नाटक करणे हे माझ्यासाठी चॅलेंज होतं.
तू नाटक, मालिका आणि चित्रपट केले आहेत, त्यामुळे या तिन्ही माध्यमांच्या प्रेक्षकवर्गाविषयी काय सांगशील?
ल्ल जेव्हा मालिका करीत असतो, त्या वेळी प्रेक्षक हे खूपच त्या भूमिकेशी भावनिक कनेक्ट असतात. ते स्वत:ला त्या भूमिकेत पाहत असतात. त्यामुळे ही कलाकारासाठी मोठी जबाबदारी असते, तर चित्रपट ज्या वेळी करतो, त्या वेळी प्रेक्षकवर्गाचे प्रेम कळते. कारण ते आपला पैसा खर्च करून कलाकारांचा अभिनय पाहायला येत असतात. तसेच नाटक म्हणाल, तर, प्रत्यक्ष प्रेक्षकवर्गच असतो. त्या वेळी स्वत: ते समोर येऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.