हेमांगी कवीनं महिला दिनानिमित्ताने मानले पुरुषांचे आभार, म्हणाली - 'पुढचा जन्म वगैरे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 08:41 PM2023-03-08T20:41:42+5:302023-03-08T20:41:59+5:30

Hemangi Kavi : सध्या हेमांगीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

Poet Hemangi thanked men on the occasion of Women's Day, said - 'Next birth etc...' | हेमांगी कवीनं महिला दिनानिमित्ताने मानले पुरुषांचे आभार, म्हणाली - 'पुढचा जन्म वगैरे...'

हेमांगी कवीनं महिला दिनानिमित्ताने मानले पुरुषांचे आभार, म्हणाली - 'पुढचा जन्म वगैरे...'

googlenewsNext

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिला सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. हेमांगीने महिला दिनाचे निमित्त साधत तिचा एक स्पेशल व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत तिने एक पोस्ट देखील लिहिली आहे. सध्या हेमांगीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

हेमांगीने महिला दिनानिमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती बिनधास्त वावरताना दिसते आहे.  बॅकग्राउंडला मराठीतील एक सुमधूर अर्थपूर्ण भावगीत ऐकायला मिळत आहे. 'एकाच या जन्मी जणू.. फिरुनी नवी जन्मेन मी..' याच गाण्याला धरुन हेमांगीची पोस्ट आहे. याच गाण्यातून स्त्रीचे अस्तित्व खूप सुंदर पद्धतीने ज्यांनी समोर आणले अशा गाण्याचे गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार-गायक सुधीर फडके यांना 'महापुरुष' संबोधत अशा विचारसरणीच्या अनेक पुरुषांचे तिने महिला दिनानिमित्ताने आभार मानले आहेत.


या पोस्टमध्ये हेमांगी कवी म्हणते की, पुढचा जन्म वगैरे असतो नसतो… मला माहीत नाही! पण या गाण्याप्रमाणे याच जन्मातच फिरून फिरून प्रत्येक क्षणाला नवा जन्म घेत राहीन! किती ही संकटं आली, माझा आवाज दाबण्याचा, माझी मते धुडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी बोलत राहीन, लिहीत राहीन. जी एका नवीन जीवाला जन्म देऊ शकते ती स्वतःला ही पुन्हा पुन्हा जन्म देऊच शकते. स्वतःला जपू, वाढवू शकते. न घाबरता, न लाजता. तिला संपवण्याचं सामर्थ्य कुणामध्येच नाही हे पदोपदी लक्षात ठेवायला हवं! या गाण्याची गंमत अशी की हे गाणं एका पुरुषाने कवी सुधीर मोघे यांनी लिहीले आणि तितक्याच सुंदर पद्धतीने स्वरबद्ध केले. आणखी एका पुरुषाने संगीतकार सुधीर फडकेंनी. बाईचं अंर्तमन, तिचे जगणे अशाच काही महापुरूषांना कळले असावे म्हणूनच आज मी हे लिहू, वाचू, व्यक्त करू शकते.
अशाच पुरूषांच्या विचारसरणीमुळे आणि साथीने जर हा दिवस येऊ शकतो तर तो दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी सर्व स्तरातील सर्व बाबतीत समानता येऊन स्त्रियांसाठीचा असा एक खास दिवस साजरा करणं थांबेल आणि खऱ्या अर्थाने स्त्रीजन्म साजरा होईल तो पर्यंत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा''. अशा शब्दात हेमांगी कवीने महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Poet Hemangi thanked men on the occasion of Women's Day, said - 'Next birth etc...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.