हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. असंच काहीसं घडलं ते अभिनेत्री पूजा बत्रासोबत.सुरुवातीला चांगल्या सिनेमात झळकून सुद्धा बॉलिवूडमध्ये हवे तसे तिला यश मिळू शकले नाही. परिणामी ती कधी आली आणि कधी गेली हे सुद्धा चाहत्यांना कळाले नाही.
विशेष म्हणजे अभिनयात येण्यापूर्वीच पूजा प्रसिद्ध मॉडेल बनली होती. 1993 मध्ये 'मिस इंडिया' ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर पूजानं 'मिस इंटरनॅशनल' स्पर्धेमध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.अल्पावधीतचं पूजा आघाडीच्या मॉडेल्सच्या यादीमध्ये गणली जात होती. मॉडेलिंग सुरु असतानाच तिला अनेक हिंदी सिनेमाच्या ऑफर्स येत होत्या.मात्र नकार देत शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती परदेशी निघून गेली.
परदेशातून परतल्यानंतर 'विरासत' सिनेमा तिने केला. पूजाचा पहिलाच सिनेमा हिट झाल्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळत गेल्या. 'भाई', 'हसीना मान जायेगी', 'कही प्यार ना हो जाए', 'नायक' या सिनेमांमध्ये ती झळकली. हिंदीतच नाहीतर पूजाने तमीळ, तेलुगु आणि मल्याळम सारख्या इतर भाषांमधल्या सिनेमातही काम केले.अभिनयानेच नाहीत सौंदर्यावर चाहते फिदा असायचे. इतकं सगळं करुनसुद्धा तिला या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करता आले नाही. बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री ती बनू शकली नाही.
अभिनयापासून दूर जात तिने लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली. 2002 एनआरआय डॉक्टर सोनू अहलुवालियाशी लग्न करत संसारात रमली. मात्र त्यांचे हे लग्न फार काळ काही टिकले नाही. अखेर 2011 मध्ये दोघांनी घटस्फोट घेत वेगळे झाले. यानंतर 2017 मध्ये पूजाने पुन्हा बॉलिवुडमध्ये कमबॅक केलं. 'मिरर गेम' या सिनेमात ती झळकली. मात्र हा सिनेमाही फार काही कमाल दाखवू शकला नाही. 2019 मध्ये पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. 'टायगर जिंदा है' या सिनेमात काम केलेल्या नवाब शाहसोबत तिने लग्नगाठ बांधली. आज पूजा बत्रा सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रीय असते.