Join us

पाचवेळा प्रेमात अपयशी ठरलेल्या पूजा बेदीचं काय आहे लग्नाबाबतचं मत, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 3:26 PM

पूजा बेदी आपल्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत असते

आमिर खानच्या जो जिता वही सिंकदर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पूजा बेदीने  डेब्यू  केला. या चित्रपटानंतर ती लुटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, शक्ती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी आपल्या हॉट फोटोंना घेऊन चर्चेत असते. पूजा बेदी आपल्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत असते. 2019 मध्ये पूजाने मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला आहे.

पूजा बेदीचा असा विश्वास आहे की तिच्या पूर्वीच्या नात्यामुळेच तिला एक चांगली व्यक्ती बनली आहे आणि यामुळे तिच्या मनात काही कटुता नाही. पूजा म्हणाली की तिची दोन्ही मुले देखील तिला सपोर्ट करतात आणि मुलांना देखील पूर्वीच्या नात्यांकडून कोणतीही तक्रार नाही. 

पूजा सध्या बिझनेसमन मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार पूजा एका मुलाखती दरम्यान म्हणाली की, अयशस्वी नात्यांनंतरही तिचा लग्नावरील विश्वास कायम आहे. अनुभवामुळे आपण अधिक चांगले बनतो, त्यामुळे त्यात काही कटूता यायला नको. पूजाच्या दुसऱ्या लग्नाला तिच्या मुलांचा सपोर्ट आहे. 

पूजा आजवर पाच वेळा प्रेमात पडली आहे. पूजाने मे 1994 मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. साडे तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांना दोन मुलं देखील आहेत. तिची मुलगी आलियाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.

टॅग्स :पूजा बेदी