गोव्याच्या बीचवर न्यूड होऊन धावणे अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण याला महागात पडले. याप्रकरणी त्याच्यावर कलम 294 अंतर्गत अश्लिल चाळे केल्याचा व कलम 67 अंतर्गत सोशल मीडियावर अश्लिल साहित्याचा प्रसार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिनेत्री पूजा बेदी मात्र मिलिंदवरच्या या कारवाईने भडकली होती. मिलिंदला अगदी भरभक्कम पाठींबा देत ती त्याच्या बाजूने मैदानात उतरली होती.
गोव्याच्या बीचवर न्यूड पळतानाच्या मिलिंदच्या फोटोत काहीही अश्लिल नाही, असा दावा तिने केला होता. केवळ इतकेच नाही तर न्यूडिटी क्राईम आहे तर सर्व नागा साधूंना अटक करा, असेही ती म्हणाली होती.मात्र पूजा बेदीला मिलिंद सोमणच्या या कृत्यावर त्याला पाठिंबा देताना दिसली तिला त्याचा इतका पुळका कशासाठी असा विचारही तुम्ही केला असेल मात्र त्याला कारणही तसे खासच आहे.
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर वारंवार असे सेलिब्रिटींचे प्रसिद्धीचे स्टंट पाहायला मिळतात. मात्र आजपासून जवळपास ४० वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया किंबहुना मीडियाचा इतका गाजावाजा नव्हता त्या काळातही काही सेलिब्रिटी प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करायचे. काही सेलिब्रिटी झगमगत्या चंदेरी दुनियेत संधी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होते. ही बाब मॉडेल आणि नृत्यांगणा प्रोतिमा बेदीबाबत तंतोतंत लागू पडते.
प्रोतिमा म्हणजे प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांची पहिली पत्नी. दोन वर्षांआधी कबीर बेदी यांनी चौथं लग्न केले होते. चार पत्नींपैकी त्यांची पहिली पत्नी म्हणजे प्रोतिमा बेदी. कबीर आणि प्रोतिमा यांची लेक म्हणजे अभिनेत्री पूजा बेदी. 'सिनेब्लिट्झ' या मासिकासाठी प्रोतिमा नग्न होऊन बीचवर धावल्या होत्या.
1974 साली हे मासिक लाँच होणार होते. तेव्हा मासिकाच्या प्रमोशनसाछी मासिकाचे प्रमुख करंजिया यांनी प्रोतिमांना असे करण्यास सांगितले होते. मासिकाला हिट करण्यासाठी सिनेब्लिट्झची टीम विवस्र होऊन बीचवर धावणा-या मॉडेलच्या शोधात होती. मात्र त्यासाठी त्या काळात कोणतीही मॉडेल हे करण्यास धजावणार नव्हती.'सिनेब्लिट्झ' मासिकाच्या संपादिका रुसी यांनी प्रोतिमा यांचे नाव पुढे केले. प्रोतिमा यांना याबद्दल विचारले असता त्यांनीही ते मान्य केले होते.