Pooja Bhatt Birthday : जेव्हा करिश्मा कपूरसोबत पूजा भट्ट झालं होतं मोठं भांडण, पण काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:41 PM2022-02-24T12:41:47+5:302022-02-24T12:42:21+5:30
Pooja Bhatt Birthday : आज २४ फेब्रुवारीला पूजाचा (Pooja Bhatt Birthday) ५०वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने फॅन्स तिला शुभेच्छा देत आहेत.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आणि फिल्म मेकर म्हणून इंडस्ट्रीत आपली वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री पूजा भट्टने (Pooja Bhatt) ९०च्या दशकात अनेक सिनेमे केले. सुंदर दिसणाऱ्या पूजा भट्टची फॅन फॉलोईंग चांगली होती. लोक तिची एक झलक बघण्यासाठी आतुर असायचे. आज २४ फेब्रुवारीला पूजाचा (Pooja Bhatt Birthday) ५०वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने फॅन्स तिला शुभेच्छा देत आहेत.
पूजा भट्टने तिच्या करिअरची सुरूवात १९८९ मध्ये 'डॅडी' सिनेमातून केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन तिचे वडील महेश भट्ट यांनी केलं होतं. पूजा केवळ १७ वर्षांची असताना अभिनेत्री झाली होती. तिला पसंत केलं गेलं. ती अभिनयासोबतच फिल्म मेंकिगसाठीही प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर अनेक वादातही ती अडकली. पूजा ही बिनधास्त मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते.
करिश्मा कपूरसोबत कॅट फाइट
करिश्मा कपूर आणि पूजा भट्ट यांच्यातील भांडणाचं कारण वेगळं काही नाही तर केवळ एकमेकींच्या पुढे जाणं हेच होतं. सोबतच पूजाने करिश्माचे आई-वडील रणधीर कपूर-बबीता यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यावेळी बबीता आणि रणधीर कपूर वेगवेगळे राहत होते. त्यावेळी करिश्मा कपूरने पूजाला खूप ऐकवलं होतं. कारण करिश्मा तिच्या बोलण्यामुळे संतापली होती.
करिश्मा काय म्हणाली होती?
ती एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'तू सांग माझी काय चूक आहे. पूजा भट्ट आहे. जी माझ्या पॅरेंट्सबाबत वाईट बोलली आणि मी सुद्धा त्याचं सडेतोड उत्तर दिलं. कारण तिला काहीच अधिकार नाही की, ती माझ्या पॅरेंट्सबाबत असं काही बोलेल. मनीषा कोईरालाने मला काहीच कारण नसताना 'मिक्स्ड-अप' किड म्हटलं होतं आणि मी तिलाही ऐकवलं होतं'.
तेव्हा दोघींमध्ये वाद होते पण आता करिश्मा कपूर आणि पूजा भट्ट यांच्यात चांगलं नातं आहे. १९९० दरम्यान पूजा भट्टने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'मला ९०च्या दशकात फार एकटं वाटत होतं. माझ्या सोबतच्या अभिनेत्रींनी ९० पेक्षा जास्त सिनेमे केले. तेच मी केवळ २३ सिनेमे केले. त्या काळात मी जास्त लोकांसोबत कनेक्ट होऊ शकत नव्हते'.