बॉलिवूडमध्ये भट कँपचा आधीपासूनच दबदबा आहे. महेश भट आणि विक्रम भट या दिग्दर्शक निर्मात्यांनी एकापेक्षा एक चित्रपट दिलेत. महेश भट यांची मुलगी आलिया भट तर बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. तर त्यांची मोठी मुलगी पूजा भटनेही (Pooja Bhatt) एक काळ गाजवला. आता नुकतंच पूजाने तिला सतत लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर दिलं आहे. तसंच सावत्र बहीण आलियाची लेक राहाबद्दलही ती बोलली आहे.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत पूजा भट म्हणाली, "लोक आजही मला विचारतात की मी परत लग्न का केलं नाही? जेव्हा मी लग्न केलं तेव्हा लोकांना प्रॉब्लेम होता आणि आता मी लग्न का नाही करत यावरही प्रॉब्लेम आहेच. लोकांना नेहमीच काही ना काही बोलायचं असतं. मला वाटतं कोणालाही आपला पार्टनर बनवण्याआधी त्याला मित्र बनवायला हवं. दुसऱ्यांपेक्षा जास्त आपण स्वत:वर लक्ष दिलं पाहिजे. लोक जास्तकरुन दुसऱ्यांना सल्ला देण्यातच व्यस्त असतात."
यासोबत पूजाने रणबीर आणि आलियाची लेक राहावरचं प्रेम व्यक्त केलं. ती म्हणाली, "राहा सगळ्यांच्या तुलनेत खूपच हुशार आहे. मी तर त्या दिवसाची वाटच पाहतीये की कधी राहा इतरांना सल्ले देईल. सध्या दोन्ही कुटुंब तिच्यावर प्रेमाची उधळण करत आहेत."
पूजा भटने 'बिग बॉस' ओटीटी 2 मध्ये सहभाग घेतला होता. ती या शोमध्ये फायलनपर्यंत पोहोचली होती. बऱ्याच कालावधीनंतर पूजा अशी सर्वांसमोर आली होती. या शोमध्येही तिने वैयक्तिक आयुष्याबाबतीत अनेक खुलासे केले.