अभिनेत्री पूजा सावंत ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. २०१० साली क्षणभर विश्रांती (Kshanbhar Vishranti) या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दगडी चाळ (Dagadi Chawl), लपाछपी (Lapachhapi) या चित्रपटातून तिने अभिनयाची छाप सोडली आहे. पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता एका मुलाखतीत पूजा सावंतने चित्रपटात काम कमी मिळत असल्याची खंत व्यक्त केली आहे. यामागचं कारणही तिने सांगितले आहे.
पूजा सावंतने एका मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितले. यावेळी तिने एक खंत व्यक्त केली. ती म्हणाली की, मला चित्रपट मिळतात पण माझी उंची जास्त असल्यामुळे बऱ्याचदा कामे नाकारली जातात. कथानक वगैरे सगळे आवडले असले तरी नायक कोण असणार यावर माझी निवड ठरते. कारण चित्रपटाचा नायक उंच नसेल तर मला रिजेक्ट केले जाते. म्हणजे जर माझ्याकडे ५ चित्रपट आले तर त्यातले निवडकच चित्रपट मला करायला मिळतात. मी ज्यांच्यासोबत काम केले ते आज माझे मित्र झाले आहेत.
...मगच ट्रोलिंग करावंकलाकार असल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्याबद्दल ती सांगते की, निगेटिव्ह कमेंटमुळे मला खूप त्रास होतो. निगेटिव्ह कमेंट आली तर मी ती वाचते अन लगेचच डिलीट करते.ट्रोलिंग करणाऱ्याने अगोदर त्याची लायकी बघायला हवी आणि मगच ट्रोलिंग करावं. प्रत्येकामध्येच काहीतरी कमी असते हे आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे.
वर्कफ्रंट...
अभिनेत्री पूजा सावंतने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील ती सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने क्षणभर विश्रांती चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने काम केले आहे. तसेच तिने जंगली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.