Join us

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:08 PM

सोनाक्षी आणि जहीर इकबाल यांच्या लग्नाची चर्चा

शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. २३ जून रोजी ती बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत रजिस्टर मॅरेज करणार आहे. सध्या त्यांचं वेडिंग इन्व्हिटेनशन सोशल मीडियावर व्हायरल होतंय. अभिनेत्री पूनम ढिल्लो (Poonam Dhillon) यांनी सोनाक्षीच्या या व्हायरल इन्व्हिटेशनची बातमी कन्फर्म केली आहे. तसंच सोनाक्षीला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान जहीरबाबत त्या काय म्हणाल्या हेही फार इंटरेस्टिंग आहे.

सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर मॅरेज आणि रिसेप्शन पार्टीसाठी जवळच्याच लोकांना आमंत्रित केलं आहे. त्यांचं ऑडिओ इन्व्हिटेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं. मुंबईतील एका हॉटेलमध्ये ग्रँड पार्टी असणार आहे. अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनाही हे invitation मिळालं आहे. त्या म्हणाल्या, "सोनाक्षीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तिने खूप सुंदर invitation पाठवलं आहे. मी सोनाक्षीला ती अगदी लहान असल्यापासून ओळखते. मी  तिचा पूर्ण प्रवास पाहिला आहे. देव करो ती नेहमी आनंदी राहो. ती खूपच प्रेमळ आहे. जहीर, प्लीज तिला खूश ठेव. ती खूपच गोड मुलगी आहे आमची लाडकी आहे."

एकीकडे सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे याबाबत तिच्याच कुटुंबियांना काही माहित नसल्याचं समोर आलं. वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीला आशीर्वाद दिले. मात्र आजकालची मुलं पालकांची परवानगी घेत नाहीत असंही ते म्हणाले. तर सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने मला या प्रकरणी काहीच माहित नसल्याचं सांगितलं.

सोनाक्षी सिन्हा जहीरसोबत २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. एका सिनेमा. २०२२ साली त्यांनी 'डबल XL' सिनेमात काम केलं होतं. सलमान खानने त्यांची भेट घडवून आणली होती अशीही चर्चा आहे. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हापुनम ढिल्लोबॉलिवूडजहीर इक्बाललग्न