सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट राधेः योर मोस्ट वॉण्टेड भाई ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा चित्रपट कोरोना संकटामुळे भारतात चित्रपटगृहाऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. मात्र दुबई ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. भारताप्रमाणेच विदेशात प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 'राधे' चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळतो आहे.
ऑस्ट्रेलिया बॉक्स ऑफिसच्या दुसर्या दिवसाच्या दिवशी ६९ स्क्रिन कलेक्शन ७४ हजार ९६६ डॉलर म्हणजेच ५४.९३ लाख रूपयांपर्यंत पोहोचले आहे. न्यूझीलंडमधील २६ स्क्रिनचे कलेक्शन १३ हजार ६०७ डॉलर म्हणजेच ९.९७ लाख रूपयांपर्यंत पोहोचले आहे.
राधेने दोन दिवसांत ६४.९ लाखांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाने चांगलीच मजल मारली आहे. दुबईमध्ये देखील पहिल्या प्रीमिअरच्या वेळी चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'राधे' चित्रपटाने दुबईत ४० लाख डॉलर म्हणजे २.९१ कोटींचा बिझनेस केला आहे.