Join us

सकारात्मक बदल घडवणारा ‘ताटवा’

By admin | Published: May 31, 2017 5:13 AM

सामजिक विषयावर भाष्य करणाऱ्या शरयू आर्ट प्रॉडक्शन निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाच्या सशक्त आशयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीची

सामजिक विषयावर भाष्य करणाऱ्या शरयू आर्ट प्रॉडक्शन निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाच्या सशक्त आशयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीची पावती चित्रपटाला मिळत आहे. अनेक चित्रपटगृहांमध्ये रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून सामाजिक संदेश समाजातील लोकांपर्यंत पोहचवून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न या चित्रपटातून झाला असल्याची भावना प्रेक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. संवेदनशील विषय दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्यामुळे या प्रश्नाची समाजाला जाणीव होईल असा विश्वासही प्रेक्षकांनी व्यक्त केला. ‘प्रेम’ आणि ‘कला’ या दोन गोष्टी अशा आहेत ज्यांना जातीचं बंधन कधीच अडवू शकत नाही. प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमाची कथा गुंफली आहे. ‘ताटवा’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. शरयू पाझरे यांची असून दिग्दर्शन अरुण नलावडे यांनी केलं आहे. संजय शेजवळ, आणि गौरी कोंगे ही नवी जोडी ‘ताटवा’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे. सोबत अरुण नलावडे, डॉ. शरयू पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ.सरिता घरडे, विक्रांत बोरकर, नूतन धवणे, शीतल राऊत, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजूषा जोशी व बाल कलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत.