Join us

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मेरे प्यार प्राईम मिनिस्टर'चे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 17:17 IST

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आपला आगामी सिनेमा 'मेरे प्यार प्राईम मिनिस्टर'चे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे

ठळक मुद्दे हा सिनेमा 15 मार्च 2019ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आपला आगामी सिनेमा 'मेरे प्यार प्राईम मिनिस्टर'चे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, गांधी नगरमध्ये राहणाऱ्या कान्हूना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. अधिक माहितीसाठी वाट पाहा 10 फेब्रुवारीची.  

'मेरे प्यार प्राईम मिनिस्टर'मधून सार्वजनिक शौचालयांच्या कमतरतेवर  भाष्य करण्यात येणार आहे. ओमप्रकाश मेहरा यांची पत्नी भारती मेहरा या सिनेमाची निर्मिती करतायेत.  

या सिनेमाचे शूटिंग मेहरा यांनी मुंबईतल्या  झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन या सिनेमाचे शूटिंग केले आहे. शूटिंगच्या आधी त्यांनी जवळपास एक महिना जागांची रेकी केली. राकेश ओमप्रकाश मेहरांनी या मेरे प्यारे प्राईम मिनिस्टरमधून देशातली खूप मोठी समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमातून आई-मुलांच्या संबंधाना अधोरेखित करण्यात आले आहे. या सिनेमात राष्ट्री पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील देखील दिसणार आहे. जिने यात आईची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे संगीत शंकर-एहसान-लॉय यांच्या जोडीने दिले आहे आणि सिनेमातील गाणी गुलजार यांनी लिहिली आहेत. . हा सिनेमा 15 मार्च 2019ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेहरा यांनी आतापर्यंत "रंग दे बसंती" आणि "भाग मिल्खा भाग" सारखे दमदार सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या आगामी 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या रिलीजची वाट त्यांचे फॅन्स नक्कीच पाहात असतील. 

टॅग्स :राकेश ओमप्रकाश मेहरा