Join us

ना श्रद्धाचा 'स्त्री 2' ना Jr NTRचा 'देवरा', 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 1:17 PM

2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता ? श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' दुसऱ्या क्रमांकावर!

Highest Grossing Indian Movie 2024 : यंदा अनेक सिनेमे प्रदर्शित झालेत. त्यापैकी काही सिनेमे फ्लॉप झाले आहेत. तर काही सिनेमे मात्र ब्लॉकबास्टर ठरले. यात 'कल्की 2898 एडी', 'स्त्री 2', 'देवरा भाग 1', 'सिंघम अगेन', 'भूल भुलैया 3' हे चित्रपट हीट ठरले. पण, यापैकी कोणता सिनेमा आहे, जो 2024 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया. 

फिल्म इंडस्ट्रीसह सिनेप्रेमींमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' ची चर्चा पाहायला मिळाली. या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.  'स्त्री 2' ने 874.58 कोटी कमावले. पण, 'स्त्री 2' हा 2024 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट नाही. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

'कल्की 2898 एडी' हा 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे. प्रभास, अमिताभ बच्चन व दीपिका पादुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट 27 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल 1,200 कोटींची कमाई करत हा चित्रपट सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा भारतीय सिनेमा ठरला. ही माहिती IMDb ने दिली आहे. 

याशिवाय, तिसऱ्या क्रमांकावर 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' आणि 'देवरा' सिनेमा चौथ्या क्रमांकावर आहे. 'कल्की 2898 एडी' हा हिंदी भाषेतील चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. तर 'स्त्री 2' हा प्राईम व्हिडीओवर पाहू शकता. तर 'देवरा' सिनेमादेखील नेटफ्लिक्सवर  प्रदर्शित झाला आहे.  

टॅग्स :प्रभासश्रद्धा कपूरअमिताभ बच्चनसिनेमा