Join us

Kriti Sanon Prabhas: काय सांगता? प्रभास व क्रिती सॅनन एकमेकांच्या प्रेमात? अशी सुरू झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 10:26 AM

Kriti Sanon And Prabhas' Dating : बॉलिवूडची मोस्ट गॉर्जिअस अ‍ॅक्ट्रेस क्रिती सॅनन सध्या तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. होय, चर्चा खरी मानाल तर क्रिती साऊथ सुपरस्टार प्रभासला डेट करतेय.

 Kriti Sanon And Prabhas' Dating : बॉलिवूडची मोस्ट गॉर्जिअस अ‍ॅक्ट्रेस क्रिती सॅनन (Kriti Sanon ) सध्या तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. होय, चर्चा खरी मानाल तर क्रिती साऊथ सुपरस्टार प्रभासला (Prabhas ) डेट करतेय. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या लव्हलाईफचीच चर्चा आहे.क्रिती व प्रभासच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या त्या  ‘कॉफी विद करण 7’ या शोनंतर. या शोमध्ये अलीकडे क्रिती सहभागी झाली होती. कॉलिंग सेगमेंट राऊंडमध्ये क्रितीने प्रभासला फोन केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये स्पेशल बॉन्ड असल्याचं समोर आलं होतं. आता क्रिती व प्रभास यांच्यात रोमॅन्टिक रिलेशनशिप असल्याचं म्हटलं जात आहे.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांत चांगली मैत्री झाली आणि आता दोघांचं नातं मैत्रीपेक्षा पुढे गेल्याचं म्हटलं जात आहे. दोघांच्या स्पेशल बॉन्डने सर्वांना हैराण केलं आहे. कारण प्रभास कमालीचा लाजरा आहे. पण क्रितीसोबत तो अगदीच मनमोकळा बोलतो, वावरतो. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये काहीतरी शिजतेय, अशी चर्चा त्यामुळेच सुरू झाली आहे. अर्थात सध्यातरी दोघांच्या नात्याबद्दल काही म्हणणं घाईघाईचं ठरेल. कारण हे नातं अगदी हळूहळू पुढे जात आहे.

सेटवरच्या सूत्रांच्या मते, चित्रपट रॅप अप झाल्यानंतरही प्रभास व क्रिती यांच्यातील खास बॉन्ड कायम आहे. दोघंही एकमेकांना फोन वा मॅसेज करण्याची एकही संधी सोडत नाही. यावरून दोघांच्या मनात एकमेकांबद्दल खास फिलिंग्स आहेत, असं जाणवतंय. अर्थात त्याला सध्या तरी रिलेशनशिपचं नाव देता येणार नाही.गेल्यावर्षी क्रिती प्रभासबद्दल भरभरून बोलली होती. मी पहिल्यांदा प्रभासला पाहिलं तेव्हा त्याला पाहून तो काहीसा नर्व्हस असल्याचं मला वाटतं. पण त्याच्याशी बोलले तेव्हा तो बराच फ्रँक असल्याचं मला जाणवलं. याआधी प्रभासचं नाव साऊथ अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत जोडलं गेलं होतं.

‘आदिपुरूष’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सॅनन, सैफ अली खान हे कलाकारदेखील दिसणार आहेत. हा सिनेमा 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होतोय. दिग्दर्शक ओम राऊत याचा हा दुसरा चित्रपट. आधी त्याने अजय देवगण बरोबर ‘तान्हाजी’ हा चित्रपट बनवला होता. तान्हाजीमध्ये अजय देवगण, सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसले होते.  

टॅग्स :क्रिती सनॉनप्रभास