Join us

Prabhas Wedding : प्रभास लवकरच चढणार बोहल्यावर, तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे, कोण आहे त्याची दुल्हनिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 9:36 AM

Prabhas : 'आदिपुरुष' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेता प्रभासला लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने मजेशीर अंदाजात उत्तर दिले.

साऊथचा सुपरस्टार प्रभास(Prabhas)चा बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) १६ जूनला प्रदर्शित होतो आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या १० दिवस आधी निर्मात्यांनी फायनल ट्रेलर लाँच केला आहे. या नवीन ट्रेलरमध्ये नवीन सीन आणि डायलॉग्स पाहायला मिळाले. मात्र प्रभास चर्चेत येण्यामागे आदिपुरुषचा ट्रेलर कारणीभूत नाही तर त्याने ट्रेलर लाँचवेळी दिलेले उत्तर आहे.

खरेतर प्रभास देशातील मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक आहे. अशात त्याचे चाहते नेहमीच त्याच्या रिलेशनशीप आणि लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मात्र या प्रश्नांवर नेहमीच तो चुप्पी साधतो. मात्र आता त्याने चाहत्यांची उत्सुकता शांत करण्यासाठी हैराण करणारे उत्तर दिले आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी जेव्हा त्याला लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा प्रभासने मजेशीर अंदाजात म्हटले की, मी तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे. त्याच्या या उत्तराने चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरवर्षी रिलीज करणार दोन चित्रपट

ट्रेलर लाँचवेळी, प्रभासने आपल्या चाहत्यांना एक वचनदेखील दिले. आता तो दर वर्षी दोन चित्रपट घेऊन येणार आहे. इतकेच नाही तर त्याने हेदेखील म्हटले की, शक्य असेल तर तिसऱ्या चित्रपटावरदेखील काम करायला सुरूवात करेन. एसएस राजामौलींच्या बाहुबली आणि बाहुबली २ नंतर प्रभास पॅन इंडिया स्टार बनला आहे. फक्त साऊथमधीलच नाही तर देशभरातील प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत असतात.

टॅग्स :प्रभासआदिपुरूष