Join us

प्रभासने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला हा पहिला फोटो, चाहत्यांनी भरभरून दिले लाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:34 PM

प्रभासने इन्स्टाग्रामवर 16 एप्रिलला पदार्पण केल्यानंतर देखील काही दिवस कोणतीच पोस्ट टाकली नव्हती. पण तरीही त्याच्या फॉलोव्हर्सची संख्या लाखोंवर होती. 

ठळक मुद्देप्रभासने आता इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट टाकली असून त्याने तलवारीचे प्रशिक्षण घेत असतानाच एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या फोटोला केवळ 21 तासात 2 लाख 98 हजार लोकांनी लाईक केले आहे.

एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन सिनेमांमुळे प्रभासने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. प्रभास फेसबुकच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतो. प्रभासच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आणखी एक खुशखबर आहे. फेसबुकनंतर आता प्रभासने इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. प्रभासने इन्स्टाग्रामवर 16 एप्रिलला पदार्पण केल्यानंतर देखील काही दिवस कोणतीच पोस्ट टाकली नव्हती. पण तरीही त्याच्या फॉलोव्हर्सची संख्या लाखोंवर होती. 

प्रभासने आता इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट टाकली असून त्याने तलवारीचे प्रशिक्षण घेत असतानाच एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या फोटोला केवळ 21 तासात 2 लाख 98 हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याच्या पहिल्याच फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. प्रभासने इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करून केवळ दोनच दिवस झाले असले तरी आठ लाख 73 हजार लोकांनी आतापर्यंत त्याला फॉलो केले आहे. पण तो कोणालाच फॉलो करत नाहीये. 

सध्या प्रभास साहोच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रभास सिनेमासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या सिनेमात तो अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष देत आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

'साहो'च्या अ‍ॅक्शनसाठी, हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात आलेली आहे जी प्रभासला वेगळ्या अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. या ५० लोकांची टीम प्रत्येक लहान लहान हालचाली पासून ते प्रत्येक फ्रेम बद्दल प्रभासला ट्रेनिंग देणार आहेत. ज्यामुळे अ‍ॅक्शन सीन अधिक प्रभावी होईल अशी चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.

'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या विविध भाषांमध्ये शूट केला गेला आहे. प्रभासला 'साहो' सिनेमात अ‍ॅक्शन करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :प्रभास