Ram Charan On Prabhas Love Life: सुपरस्टार प्रभास (Prabhas) नुकताच नंदामुरी बालकृष्णा(Nandamuri Balakrishna) च्या टॉक शो अनस्टॉपेबल(Unstoppable)मध्ये गेस्ट म्हणून आला होता. या शोमध्ये नंदामुरी बालकृष्णने प्रभासला त्याच्या लव्ह लाईफबद्दल अनेक प्रश्न विचारले आहे. शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रभासने राम चरण (Ram Charan)ला फोन करून आपण सिंगल असल्याची कन्फर्म केलं आहे.
अनस्टॉपेबल शोचा हा भाग दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग शुक्रवारी प्रदर्शित झाला. शोच्या एका सेगमेंटचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये नंदामुरी बालकृष्णाच्या सांगण्यावरून प्रभास राम चरणला कॉल करत असल्याचे दिसतोय. फोनवर बोलताना राम चरणने कन्फर्न केले की प्रभास सिंगल आहे आणि त्याच्या आयुष्यात अद्याप कोणतीही मुलगी नाही.
कधी होणार प्रभासचं लग्न मात्र, यानंतर राम चरण मजेत सांगितल की, प्रभास लवकरच एक गुड न्यूज देणार आहे. हे ऐकून प्रभास राम चरणला म्हणतो की तू मित्र आहेस की शत्रू? हे ऐकून शोमध्ये सगळंच हसायला लागले. यापूर्वी, अनस्टॉपेबल शोचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये नंदामुरी बालकृष्ण प्रभासला विचारतात की तू लग्न कधी करणार आहे, ज्याच्या उत्तरात अभिनेत्याने गमतीने म्हटले की सलमान खानच्या लग्नानंतर.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रभास सध्या 'सलार' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'KGF Chapter 2' दिग्दर्शक प्रशांत नील करत आहेत. प्रशांत नील आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हसन दिसणार आहे. याशिवाय प्रभासचा बिग बजेट चित्रपट आदिपुरुष पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यार रिलीज होणार आहे, ज्यामध्ये सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.