'देवाला आवडणारा आवाज', प्रल्हाद शिंदेंचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 06:17 PM2023-09-21T18:17:04+5:302023-09-21T18:21:45+5:30

प्रल्हाद शिंदेंचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ  उत्कर्षनं शिंदेने शेअर केला आहे. 

Prahlad Shinde video Shared by Utkarsh Shinde | 'देवाला आवडणारा आवाज', प्रल्हाद शिंदेंचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ

Prahlad Shinde video Shared by Utkarsh Shinde

googlenewsNext

पाऊले चालती पंढरीची वाट, चल ग सखे पंढरीला, बाप्पा मोरया रे, उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली अशी शेकडो भक्तीगीत, भावगीत, कव्वाली, कोळीगीत गाऊन आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांची गाणी आजही रसिकांच्या हदयात घर करून आहे. असाच प्रल्हाद शिंदेंचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ  उत्कर्षनं शिंदेने शेअर केला आहे. 

उत्कर्ष हा प्रल्हाद शिंदे यांचा नातू आहे. तो  सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. हा व्हिडिओ शेअर करतानाच त्यानं एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये त्याने म्हटलं की,
 

देवाला आवडणारा आवाज, 
तूच सुखकरता तूच दुःख हरता..

"आज सकाळीच हे गाणं ऐकूण झालं.गणपतीचा माहोल बनवायचा म्हंटल की हे गाणं तर झालच पाहीजे. कैकदा भेटणारे चाहते ह्या गाण्याच्या आठवणी सांगतात.आमच्‍या लहानपणी आमच्‍या कोकणात घरासमोर झाडांच्‍या बागा अवती भवती रान घनदाट झाडी,आणि मग दूरवर दुसरं घर. पण ह्यात सुधा सण आले की सर्वांना एकत्रित करणारा एक आवाज कानीपडायचा. तुच्‍च सुख कर्ता तुच्‍छ दुख हर्ता ,आता तरी देवा मला पावशील का? ते ऐका सत्यनारायणाची कथा.पिढ्यानपिढ्या जिवंत असलेला हा आवाज आज ही युट्यूब, इन्स्टा रिल्समधून युवा पिढीला भुरळ घालतोय.प्रल्हाद शिंदेंच्या गाठीशी पैसा ,अवार्ड जरी कमी आले असले तरीही सर्व जाती धर्मातिल प्रेक्षाकांचं प्रेम हे सर्वात जास्त लाभलेले त्त्यांच्या सारखे बोटावर मोजण्या इतकेच असतील", असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं. 

पोस्टमध्ये पुढे तो म्हणतो की, " या गळ्याने शास्त्रीय बाज जरी जपला नसला तरी वयूंशपरंपरागत गळ्यातून येणारा करेक्ट सूर मात्र त्यांनी सांभाळला होता. मानवी मनाला आध्यात्माकडे खेचून आणणार हा आवाज .घरातले सासू सुनेचे वाद असो किवा नात्यांची गमत सांगणार गाणं असो .लोकगीतांचे सामने ते रेकॉर्ड ब्रेक करणारी वैविध्यपूर्ण अशी गाणी.त्यांच्या बरोबर काम केलेली मंडळी सांगतात वरच्या पटीत गातांना जिथे इतर गायकांचा श्वास आवाज संपायचा तिथे प्रल्हाद शिंदेंची तान सुरु व्हायची".

लहानग्यांपासुन ते वयवृद्धनाही अपलासा वाटणारा हा आवाज.मेळ्यात,चौकात,बजरात,भजनात,पारायणात, सप्‍ताहात ते घरातील देवघरात जाऊन पोहोच्‍लेला प्रल्हाद शिंदेंचा हा आवाज जो अजरामर होता आहे आणि राहिल", असे म्हणत त्याने आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. 


महाराष्ट्राच्या लोकगायकाची 23 जून 2003 ला प्राणज्योत मालवली होती.  प्रल्हाद शिंदे यांच्यानंतर त्यांचा मुलगा आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांनी त्यांच्या गायकीचा वारसा पुढे चालवला. त्यानंतर आता आदर्श, उत्कर्ष शिंदे हे देखील गाण्याच्या क्षेत्रात आपलं नाव कमावत आहेत. 
 

Web Title: Prahlad Shinde video Shared by Utkarsh Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.