प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच साडीत फोटो शेअर केले आहे. मरुन रंगाच्या साडीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहे. इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश ग़ालिब..जो जलाये ना जले बुझाये ना बने..। असं या फोटोला प्राजक्ताने कॅप्शन देते सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.