ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी (Cruise rave party) अटकेत असलेल्या शाहरुख खानच्या (shahrukh khan) लेकाच्या आर्यन खानच्या (aryan khan) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुन्हा एकदा न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता आर्यनची रवानगी पुन्हा तुरुंगात होणार असून कलाविश्वातील संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्येच प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा (prakash jha) यांनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे. सोबतच आर्यनला या प्रकरणात अडकवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
प्रकाश झा यांनी दिली प्रतिक्रिया
"अलिकडेच प्रकाश झा यांनी आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणी मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. हे नेमकं काय प्रकरण सुरु आहे याविषयी मला फारसं काही माहित नाही. पण, इतकं नक्की म्हणेन की एक स्टार किड फार मोठ्या संकटात सापडला आहे", असं प्रकाश झा म्हणाले.
Cruise rave party: 'गोडाचे पदार्थ करायचे नाहीत'; Gauri khanची सक्त ताकीद
पुढे ते म्हणतात, "मला नाही माहित या प्रकरणी कसं आणि कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी. या सगळ्या प्रकरणात इतरांना काय कमेंट केल्यात हेदेखील मला माहित नाही. मला फक्त इतकंच माहितीये शाहरुखचा मुलगा आर्यन सध्या मोठ्या संकटातून जात आहे. आणि, यातून बाहेर पडणंदेखील तितकचं कठीण आहे."
दरम्यान, प्रकाश झा यांच्या पूर्वी सुनील शेट्टीने आर्यन खानला पाठिंबा दिला आहे. त्याच्यासोबतच ऋतिक रोशन, सुझैन खान, जावेद अख्तर अशा अनेकांना आर्यनला पाठिंबा दिला आहे.