साऊथची लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी ( Sai Pallavi ) एका मुलाखतीत सद्यपरिस्थितीवर बोलली आणि तिच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं. साईने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची तुलना मॉब लिचिंगशी केली आणि नवा वाद सुरू झाला. हा वाद अंगलट येण्याची चिन्हं दिसताच साईने स्पष्टीकरण दिलं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझ्या वक्तव्यामुळे जे काही घडलं, त्याने मला खूप दु:ख झालं आहे. इथून पुढे मी काहीही बोलण्याआधी दोन वेळा विचार करेल, असं म्हणत साईने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच साऊथ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी या वादात उडी घेतली.
काय म्हणाली होती साई?‘द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? माझ्या दोन्ही घटना सारख्याच आहेत’, असं साई पल्लवी म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. नुकतंच साई पल्लवीने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत याबद्दल भाष्य केलं.
काय म्हणाले प्रकाश राज...मी मॉब लिचिंगची तुलना केलेली नाही. हिंसा कुठलीही असू देत ती चूक आहे. आपल्या धर्मात पाप आहे, केवळ असं मला म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण साई पल्लवीने वादानंतर दिलं. तिच्या याच पोस्टवर प्रकाश राज यांनी कमेंट केली.‘मानवता सर्वात आधी... आम्ही तुझ्यासोबत आहोत...,‘असं प्रकाश राज म्हणाले.