Join us

प्रार्थना बेहरेचा हा मराठमोळा लूक पाहून तुम्हीही व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:12 PM

प्रार्थना बेहरे लग्नानंतर खूप सिलेक्टीव्ह झाली आहे. त्यामुळे सिनेमांची निवड करताना आता ती विचारपूर्वकच निर्णय घेते.

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. त्याचरितीने प्रार्थनाची एक वेगळी स्टाईल आहे.  इन्स्टावर नजर टाकली तर तुम्हाला कळेल की अमुकएक फॅशन तिने कधीच फॉलो केलेली नाही. जी गोष्ट तिला भावते, जी आवडते, तीच तिच्यासाठी स्टाईल असते. अशाच प्रकारे प्रत्येकाने आपली स्टाईल फॉलो करावी. फॅशनमध्ये साडीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्री आपले साडी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. असाच साडी लूक प्रार्थना बेहरेनेही शेअर केला आहे. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर टिकली आणि मोकळे सोडलेले केस आणि हिरव्या बॉर्डरची साडीत तिच्या सौंदर्यांला चारचाँद लावले आहेत. तिचा हा मराठमोळा लूक पाहून सारेच तिच्यावर फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी', 'मितवा' अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी प्रार्थनाने जिंकली आहेत. प्रार्थना लग्नानंतर खूप सिलेक्टीव्ह झाली आहे. त्यामुळे सिनेमांची निवड करताना आता ती विचारपूर्वकच  निर्णय घेते.चित्रपटसृष्टीत एंट्री करताना वाट्याला आलेले चित्रपट तिने पटापट निवडले.

यावेळी स्क्रीप्ट काय, दिग्दर्शक कोण, कलाकार कोण, भूमिका काय, निर्माता कोण असा विचार कधीच केला नसल्याचे प्रार्थनाने कबूल केले आहे. चित्रपटात नवनवीन करण्याच्या विचाराने तसं केल्याचंही ती सांगते. मात्र आता चित्रपटांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं प्रार्थनाने म्हटलं आहे. या कामात पतीही तितकीच मदत करतो असंही तिने सांगितले आहे. कुणी काही सांगितलं तरी जे पटतं तेच करते असंही तिने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :प्रार्थना बेहरे