Join us

स्वरा भास्करची ‘रसभरी’ वेब सीरिजवर प्रसून जोशी भडकले, विचारला संतप्त करणारा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:20 PM

स्वरा भास्करने 'रसभरी' सीरिजचा ट्रेलर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला, त्यावरही बहुतांश कमेंट्स या टीका करणाऱ्या आहेत. 

'रसभरी' ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर मीम्स देखील बनवण्यात आले. लोकांनी या सीरिजवर बहिष्कार टाकावा अशी मागणी देखील सोशल मीडियावर अकेली आहे. स्वराने या सीरिजचा ट्रेलर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला, त्यावरही बहुतांश कमेंट्स या टीका करणाऱ्या आहेत. 

लेखक, कवी, गीतकार प्रसुन जोशी यांनी देखील या सीरिजवर टीकेची झोड उठवली आहे. 'ही वेबसीरिज पाहून वाईट वाटले. मद्यपान करणाऱ्या पुरुषांसमोर लहान मुलीला उत्तेजक पद्धतीन नाचायला लावणे बेजबाबदार आहे. याच्या मेकर्सना आणि प्रेक्षकांना विचार करायला हवा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की शोषण करण्याची मनमानी? मनोरंजनासाठी मुलांचा वापर करणे बंद करायला हवे'. अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या वेब सीरिजमध्ये स्वरा भास्कर एका शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या अवतीभवती सीरिजची कथा फिरते. विशिष्ट वयोगटात तरुणांच्या मनात स्त्रियांविषयी येणाऱ्या विचारांवर उपहासात्मक पद्धतीने यात भाष्य करण्यात आलं आहे. निखिल भट्ट यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. यात स्वरा भास्करसोबतच आयुषमान सक्सेना, रश्मी अगडेकर, चित्तरंजन त्रिपाठी, नीलू कोहली, प्रद्युम्न सिंह, सुनिक्षी ग्रोवर, मंजू शर्मा, अरुणा सोनी, अक्षय सोनी यांच्या भूमिका आहेत.

दरम्यान स्वरानेदेखील तिच्या वडिलांना ‘डॅडी, कृपया मी समोर असताना ही वेब सीरिज पाहू नका.’असे सांगितले होते. जिथे स्वरा स्वतःचे काम कुटुंबाला दाखवणे लज्जास्पद वाटते. तिथे रसिक कसे या वेबसिरीजला कुटुंबासोबत पाहणे पसंत करतील अशा संतप्त प्रतिक्रीया देखील उमटल्या होत्या.

टॅग्स :प्रसून जोशीस्वरा भास्कर