अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. होय, गतवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्ताला म्हणजेच २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता. यानंतर बरोबर वर्षभरानी म्हणजेच येत्या २२ व २३ जानेवारीला प्रतीक व सान्या विवाहबद्ध होत आहेत. लखनौत हा विवाह सोहळा होणार आहे. यानंतर मुंबईत या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल.
Save the dates! प्रतीक बब्बरही चढणार बोहल्यावर; गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत बांधणार लग्नगाठ!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 11:44 AM
अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गतवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्ताला म्हणजेच २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता.
ठळक मुद्देआॅगस्ट २०१७मध्ये प्रतीकने त्याच्या व्यसनाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. मी ड्रग्जच्या अधीन गेलो होतो, असे त्याने सांगितले होते.