Join us

'अजून काही ठरलं नाही...' प्रथमेश आणि मुग्धाने Video पोस्ट करत खरं काय ते सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 9:24 AM

मुग्धा की प्रथमेश नेमकं प्रपोज कोणी केलं?

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मॉनिटर आणि मोदक म्हणजेच सर्वांचे लाडके प्रथमेश (Prathamesh Laghate) आणि मुग्धा (Mugdha Vaishampayan) यांनी प्रेमाची कबुली दिली आणि सर्वांनाच आनंद झाला. अगदी आपल्याच घरातल्या व्यक्तींनी आनंदाची बातमी दिल्यासारखं सर्व मराठी प्रेक्षकांना वाटलं. ज्यांना अगदी लहान वयात टीव्हीवर बघितलं ते लाडके लिटिल चॅम्प्स लग्न करणार म्हणल्यावर सर्वच खूश झाले. आता प्रथमेश आणि मुग्धाने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यामध्ये त्यांनी एक मोठा खुलासा केलाय.

गायिका मुग्धा वैशंपायन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मुग्धा वैशंपायन ऑफिशियल हे तिचं युट्यूब चॅनल आहे ज्यावर ती अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. मुग्धा आणि प्रथमेशने प्रेमाची कबुली दिली अन् सोशल मीडियावर प्रश्नांचा भडिमार सुरु झाला. कसं जुळलं, लग्न कधी करणार, मुग्धा इतक्या लहान वयात का लग्न करतेय, एकमेकांमध्ये काय आवडलं असे प्रश्न येऊ लागले. या सर्व प्रश्नांनी उत्तरं दोघांनी व्हिडिओतून दिली आहेत. या सगळ्यात एक कॉमन प्रश्न म्हणजे लग्न कधी आहे? तर यावर दोघंही म्हणाले,'आम्ही आयुष्यात सेटल झालो आहोत आणि या स्टेजला येऊन लग्न करण्यात काहीच हरकत नाही असं आम्हाला वाटतं. तसंच मुग्धा २३ वर्षांची आहे आणि आमच्यात ४ ते ५ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे आम्ही कबुली दिली म्हणजे लगेच महिन्याभरात लग्न करत आहोत असं नाही. अजून काही ठरलं नाहीए.'

मुग्धा हसतच म्हणाली,'लग्न कधी करणार हे अजून ठरलं नाही. त्यामुळे माझं लग्नव २३ व्या वर्षीच होणार की २४ व्या वर्षी हे माहित नाही. त्यासाठी वाट बघा.'

दोघांनी व्हिडिओतून कसं जुळलं हेही सांगितलं. एकमेकांच्या गाण्याचे जॉनर सारखेच असल्याने एकत्र कार्यक्रम होऊ लागले. गेले तीन ते चार वर्षांपासून दोघंही डेट करत आहेत. तसंच प्रथमेशनेच मुग्धाला प्रपोज केल्याचं त्याने यावेळी सांगितलं. मुग्धा आणि प्रथमेश सध्या विविध गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच प्रथमेश लघाटेचं चतुरंग कडून पहिलं केळवण पार पडलं. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र इतक्यात तरी दोघं बोहल्यावर चढणार नाहीत याचा खुलासा त्यांनी केलाय. 

टॅग्स :सा रे ग म परिलेशनशिपमराठी अभिनेता