Join us

प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे पहिल्यांदाच दिसणार एकत्र, 'सिंगल' चित्रपटात हास्याचा धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 2:30 PM

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ते दोघे सिंगल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव सिंगल आहे. यात प्रथमेश आणि अभिनय या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत.

प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे 'सिंगल' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून, इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. आजकाल कोणी 'एकटं' असलं की,  लोकांच्या भुवया लगेच उंचावतात. लग्न झालंय की नाही? सिंगल की कमिटेड? अशा प्रश्नांचा भडिमार सुरु होतो. आणि जर या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थी, असतील तर  विचारूच नका..!! अशा ‘सिंगल’  असलेल्यांच नेमकं काय होतं?  त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? हे दाखवणारा ‘सिंगल’ हा धमाल मराठी चित्रपट २७ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येतोय. 

किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे  यांची आहे. अभिजीत कवठाळकर,  मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

टॅग्स :प्रथमेश परबअभिनय बेर्डे