'शुभ लग्न सावधान' सिनेमामधून एनआरआय रोहनच्या भूमिकेत दिसलेला चॉकलेट हिरो प्रतिक देशमुख आता आपल्या आगामी सिनेमात वेगळ्याच लूकमधून दिसणार आहे. आगामी 'जजमेंट' सिनेमात तो यदुनाथ साटम ह्या नैराश्यग्रस्त तरूणाच्या भूमिकेत दिसेल.
आपली पहिली फिल्म 'शुभलग्न सावधान' करतानाच प्रतिक देशमुखला जजमेंट फिल्मची ऑफर मिळाली. याविषयी प्रतिक देशमुख सांगतो, 'रोहन आणि यदुनाथ दोघेही अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतलेले तरूण आहेत. एवढेच त्यांच्यातले साम्य. बाकी कौटुंबिक, मानसिक, आर्थिक पातळीवर दोन्हीही भूमिका खूप वेगळ्या धाटणीच्या आहेत. शुभलग्नमधला रोहन खूप फंकी होता. ‘यो’ टाइपमधला होता. रोहन खूप एनर्जेटिक, बबली आणि हॅपी गो लकी मुलगा होता. ‘शुभलग्न’चा रोहन काहीसा बहिर्मुख तर ‘जजमेंट’मधला यदुनाथ अतिशय अंतर्मुख मुलगा आहे.'