Join us

Big Boss 16: शिव ठाकरे जिंकू दे रे देवा... अमरावतीकरांचं देवाला साकडं, गल्लोगल्ली प्रार्थना, होम-हवन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 4:20 PM

Big Boss 16 : ‘ब‍िग बॉस १६’ चा विजेता कोण होणार? हे जाणून घेण्यास बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत. अवघ्या काही तासांत ‘ब‍िग बॉस १६’चा विजेता कोण होणार हे ठरणार आहे. तूर्तास काय तर अमरावतीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘ब‍िग बॉस १६’ चा ( Big Boss 16) विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यास बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत. अवघ्या काही तासांत ‘ब‍िग बॉस १६’चा विजेता कोण होणार हे ठरणार आहे. तूर्तास काय तर अमरावतीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण यावेळी अमरावतीचा छोकरा अर्थात शिव ठाकरे (Shiv Thackeray) ‘ब‍िग बॉस १६’च्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहे. शिव हाच विजेता व्हावा, यासाठी अख्खी अमरावती प्रार्थना करतेय. 

शिवला भरघोस मतदान करावे,  यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आवाहन केलं आहे. शिवचे समर्थक रस्त्यावर उतरून त्याच्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करत आहे. इतकंच नाही तर गल्‍लोगल्‍ली प्रार्थना केली जात आहे. काही शिवच्या चाहत्यांनी तर होम-हवन, यज्ञ करून शिव ठाकरे जिंकावा यासाठी प्रार्थना चालवली आहे.  खासदार नवनीत राणा, आमदार बच्‍चू कडू यांच्‍यासह अनेक राजकीय नेत्‍यांनी   शिव ठाकरेला शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

शिव ठाकरेने ‘ब‍िग बॉस मराठी’ हा शो जिंकला होता. आता त्याने ‘ब‍िग बॉस १६’ जिंकावा, यासाठी अमरावतीकरांनी देवाला साकडं घातलं आहे.‘ब‍िग बॉस १६’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या शिव ठाकरेने पहिल्या दिवसापासूनच उत्तम खेळ खेळत चाहत्यांची मनं जिंकली. विशेषत: त्याचा साधेपणा चाहत्यांना कमालीचा भावला.

 कोण आहे शिव ठाकरे?शिवने करिअरच्या सुरुवातीला डान्स कोरिओग्राफी, इव्हेंट मॅनेजमेंट केलं. वडिलांच्या पानाच्या दुकानातही तो बसायचा.  बहिणीसोबत त्याने वर्तमानपत्र विकली, दुधाची पाकिटंही विकली.  बिग बॉस मराठीच्या सीझन २ चा विजेता ठरला आणि हा मराठमोळा मुलगा पहिल्यांदा सर्वांच्या डोळ्यांत होता. शिव ठाकरे पहिल्यांदा रोडीजमध्ये दिसला होता.  रोडीजनंतर, शिव ठाकरे मराठी बिग बॉसमध्ये सामील झाला आणि त्या शोचा विजेता ठरला.  शिवचा जन्म ९ सप्टेंबर १९८९ रोजी अमरावतीत झाला.  शिवने आपले प्रारंभिक शिक्षण अमरावती येथून केलं.  नागपूरच्या महाविद्यालयातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली. शिवने वडिलांच्या आनंदासाठी इंजिनीअरिंग केलं, पण त्याला नेहमीच अभिनेता व्हायचं होतं.  

टॅग्स :बिग बॉसशीव ठाकरेअमरावती