बॉलिवूडमध्ये दरदिवशी नवे चेहरे पदार्पण करतात. यातील काही चेहरे टिकतात तर काही हळूहळू पडद्याआड होत जातात. तुम्हाला 2003 मध्ये आलेला मोहब्बतें सिनेमा आठवतोय?, या सिनेमातून शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी पदार्पण केले होते. शमितासोबत या सिनेमातून आणखी एका अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिचं नाव आहे प्रिती झंगियानी. मोहब्बते सिनेमानंतर प्रितीचा चेहरा घराघरात पोहोचला खरा पण त्यानंतर तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही.
प्रितीचा जन्म मुंबईतल्या एका सिंधी कुटुंबात झाला. सर्वप्रथम राजश्री प्रोडक्शनच्या ‘ये है प्रेम’ मध्ये ती झळकली. त्यानंतर ‘छुई मुई सी तुम लगती हो’ आणि ‘कुड़ी जच गई’ या गाण्यात ती दिसली. या गाण्यांमुळे प्रितीला कमालीची लोकप्रियता मिळाली. पुढे प्रितीने काही जाहिरातीही केल्या. पण जम बसत नाही म्हटल्यावर २००८ मध्ये तिने बॉलिवूड करिअर सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मॉडेल व अॅक्टर प्रवीण डब्बाससोबत तिने लग्नगाठ बांधली. प्रितीचा पती प्रवीण अभिनेताव्यतिरीक्त स्कुबा ड्रायव्हिंगही करतो. त्याला अंडरवॉटर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचीही आवड आहे. २०११ मध्ये प्रितीने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव जयवीर आहे.यानंतर २०१६ मध्ये प्रिती दुसºयांदा आई बनली. बाळाचे नाव देव असे ठेवण्यात आले.